रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याने आयपीएलच्या २०२१ सालच्या हंगामात धडाकेबाज गोलंदाजी केली होती. त्याने या हंगामात ३२ विकेट्स घेत पर्पल कॅप जिंकली होती. याच कामगिरीमुळे बंगळुरु संघाने या वर्षी त्याला १०.७५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. सध्या तो यशाच्या शिखरावर आहे. मात्र इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने मोठी मेहनत घेतली आहे. सुरुवातीच्या काळात त्याने एका पाकिस्तानी परफ्यूम विक्रेत्याच्या दुकानावर रोजंदारीने काम केले होते. हेही वाचा >> IPL 2022 GT vs PBKS : आज पंजाब-गुजरात आमनेसामने, टायटन्सपुढे विजयी सातत्य राखण्याचे आव्हान यूट्यूबर गौरव कपुरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या कार्यक्रमात हर्षल पटेलला आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भाग घेत हर्षल पटेलने त्याची जडणघडण आणि क्रिकेटपटू होण्यासाठी त्याने घेतलेले कष्ट याविषयी सांगितले. यावेळी बोलताना त्याने परफ्यूमच्या दुकानात कशा प्रकारे रोजंदारीने काम केले होते याबद्दल सविस्तर माहिती दिली. "यूएसमधील न्यू जर्सी येथे मी एका पाकिस्तानी फरफ्यूम विक्रेत्याच्या दुकानावर रोजंदारीने काम करायचो. त्यावेळी दिवसभर काम केल्यानंतर मला ३५ डॉलर मिळायचे," असे हर्षल पटेल याने सांगितले. हेही वाचा >> KKR vs RR: सामन्यापूर्वीच रिंकू सिंगने तळहातावर लिहिला होता स्कोर; राणाला बसला धक्का, पाहा व्हिडिओ तसेच विदेशातील संस्कृती तसेच भाषिक अडथळा यावरदेखील हर्षलने भाष्य केले. "पाकिस्तानी माणसाच्या दुकानावर काम करताना मला अनेक अनुभव आले. येथील लोक १०० डॉलर्सचा परफ्यूम खरेदी केल्यानंतर दोन-तीन वेळा वापर करुन तो परत करण्यासाठी यायचे. अरे मी फक्त दोन ते तीन वेळा हा परफ्यूम वापरलेला आहे. मात्र माझ्याकडे आता अन्न नाही. त्यामुळे मला तो परत करायचा आहे, असे म्हणणारे लोकदेखील मला या ठिकाणी भेटले. यामुळे मी खूप काही शिकलो. तसेच येथे काम करताना कामगाराचे जीवन कसे असते हेदेखील मला समजले," असे हर्षल म्हणाला. हेही वाचा >> भन्नाट गोलंदाजी! राजस्थानच्या कुलदीप सेनला तोड नाही, आरॉन फिंचला केलं क्लीन बोल्ड तसेच माझे काका आणि मावशी मला सकाळी सात वाजता मला ड्रॉप करायचे. मात्र दुकान नऊ वाजता सुरु होत असल्यामुळे या या काळात मी एलीझाबेथ रेल्वे स्थानकावर बसून राहायचो. त्यानंतर मी दिवसातील बारा ते तेरा तास काम करायचो, अशी आठवणदेखील हर्षल पटेलने सांगितली. हेही वाचा >> IPL 2022, KKR vs RR : उमेश यादवची अफलातून कामगिरी, देवदत्त पडिक्कलचा टिपला भन्नाट झेल तसेच गुजरातमध्ये मी ज्यूनिअर क्रिकेट खेळायला लागलो. त्यानंतर मी क्रिकेटमध्ये करिअर करु शकेन असं मला वाटायला लागलं. त्यानंतर माझ्या स्वप्नाकडे लक्ष केंद्रित करता यावे म्हणून मी माझ्या आई-वडिलांची समजूत काढली. त्यानंतर माझ्या पालकांना यूएसला जाण्यास सांगितले. पालक यूएसला गेल्यानंतर मला क्रिकेटकडे लक्ष केंद्रित करता आले, असेदेखील हर्षल पटेलने सांगितले. हेही वाचा >> सनरायझर्स हैदराबाद संकटात, वॉशिंग्टन सुंदर पुन्हा जखमी दरम्यान, हर्षल पटेल सध्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामात धमाकेदार कामगिरी करतोय. त्याला या वर्षी बंगळुरु संघाने १०.७५ कोटी रुपये देऊन खरेदी केले आहे. आतापर्यंत त्याने ११ सामन्यांत एकूण १० विकेट्स घेतल्या आहेत. बंगळुरु संघाला प्लेऑफपर्यंत पोहोचण्याची अजूनही संधी आहे.