Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings, IPL 2025 Final: आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. पंजाब किंग्ज संघाने मुंबई इंडियन्सला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दोन्ही संघांना पहिल्यांदाच आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याची संधी असणार आहे.

या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ ३ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २ वेळेस बाजी मारली आहे. तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. २०२१ मध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर विजय मिळवला होता. हा सामना पंजाबने ३४ धावांनी आपल्या नावावर केला होता.

खेळपट्टी कशी असेल?

हा गुजरात टायटन्स संघाचा होमग्राउंड आहे. या मैदानावर गुजरातच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला आहे. या मैदानावरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २१९ इतकी आहे. गेल्या १६ डावातील रेकॉर्ड पाहिला, तर ११ वेळेस २०० पेक्षा अधिक धावांचा डोंगर उभारला गेला आहे. या हंगामातील ८ पैकी ६ सामने हे पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. क्वालिफायर २ सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जसमोर विजयासाठी २०४ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पंजाबने यशस्वीरित्या पूर्ण केले होते.

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा रेकॉर्ड

एकूण सामने- ५
जिंकलेले सामने- २
पराभव- ३

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंजाब किंग्ज संघाचा रेकॉर्ड
एकूण सामने- ६
जिंकलेले सामने – ४
पराभव -२

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड

एकूण सामने -४४
प्रथम फलंदाजी करताना जिंकलेले संघ – २१
धावांचा पाठलाग करताना जिंकलेले संघ – २२
बरोबरीत राहिलेले सामने – १

या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या – पंजाब किंग्ज, ५ गडी बाद २४३ धावा, विरूद्ध गुजरात टायटन्स (२०२५)

या मैदानावरील सर्वात कमी धावसंख्या- गुजरात टायटन्स ८७ धावा, विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (२०२४)
या मैदानावरील सर्वात मोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग – कोलकाता नाईट रायडर्स ७ गडी बाद २०७ धावा विरूद्ध गुजरात टायटन्स (२०२३)
सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव – दिल्ली कॅपिटल्स, ८ गडी बाद १२०४ धावा , विरूद्ध गुजरात टायटन्स (२०२३)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.