आयपीएलच्या अकराव्या हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी, प्ले-ऑफच्या गटात स्थान मिळवणं अशक्यप्राय गोष्ट झालेली आहे. मात्र अजुनही बंगळुरुचा संघ इतर संघांना टक्कर देऊन गुणतालिकेचं गणित बिघडवू शकतो. इंदूरच्या होळकर मैदानात विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना किंग्ज इलेव्हन पंबाजविरुद्ध होणार आहे. मात्र हा सामना सुरु होण्याआधीच विराटची पत्नी आणि फिल्मस्टार अनुष्का शर्माने विराटसाठी एक खास संदेश दिला आहे.

Come on boys

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट कोहलीचं नाव आणि जर्सी क्रमांक असलेला टी-शर्ट घालून पाठमोरा फोटो अनुष्का शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोवर अनुष्काने, Come On Boys! अशी कॅप्शनही दिली आहे. त्यामुळे बायकोची इच्छा विराट आज पूर्ण करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.