Mumbai Indians Player Celebrated to Reach Playoff: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यांच्यातील संघर्ष कोणापासून लपलेला नाही. मैदानातून सुरू झालेला लखनऊ आणि आरसीबीमधील वाद सोशल मीडियावर सुरूच आहे. गुजरातकडून लखनऊच्या पराभवाचे अनेक किस्से विराट कोहलीने इंस्टाग्रामवर शेअर केले होते. यानंतर नवीनने मुंबई इंडियन्सविरुद्ध आरसीबीचा पराभव आणि विराट कोहलीची आंब्यासोबतची विकेट अशी खिल्ली उडवली होती. आता आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने नवीनला कोहलीला डिवचण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

मुंबईने गुजरातच्या विजयानंतर केले डान्स

गुजरातने हा सामना जिंकताच मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनीही प्लेऑफमध्ये पोहोचल्याचा आनंद साजरा केला. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पीयूष चावलापासून ते इशान किशनपर्यंत सर्वजण आरसीबी आणि गुजरातमधील सामना पाहत होते. यामध्ये गिलने विजयी धावा काढताच मुंबईचे सर्व खेळाडू आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात करतात. सर्वांनी एकत्र जल्लोष करत डान्स केला त्यात रोहितने ठुमके लगावले.

आरसीबीच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने २१ मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आपला सामना खेळला होता. या सामन्यात त्याने २०१ धावांचे लक्ष्य १८ षटकात पूर्ण केले होते. यामध्ये कॅमेरून ग्रीनने ४७ चेंडूत १०० धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. या विजयासह मुंबई संघाने १६ गुणांची कमाई करत टॉप-४ मध्ये स्थान मिळवले.

हेही वाचा: IPL Playoffs Schedule: गुजरातच्या विजयाने आरसीबीचा स्वप्नभंग! एममाय पलटण प्ले ऑफमध्ये दाखल, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

नवीन-उल-हकने आरसीबीच्या पराभवानंतर काय केले?

एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळत असलेल्या गुजरात टायटन्सविरुद्ध गतविजेत्या गुजरातविरुद्ध १९८ धावांचा बचाव करण्यात आरसीबी अपयशी ठरला. या पराभवामुळे विराट कोहलीचे आयपीएल जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. आरसीबीचा पराभव नवीन उल हकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक मीम शेअर केला आहे. हा एक टीव्ही अँकर सतत हसताना आणि टाळ्या वाजवताना दिसतो. नवीनने आरसीबी किंवा विराटचे नाव लिहिलेले नाही. पण स्टोरीवर पोस्ट का केली आणि कशासाठी? हे त्याच्या टायमिंगवरून स्पष्ट होते.

आता एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना लखनऊशी होणार

आयपीएलच्या या हंगामातील प्ले ऑफ सामने २३ मे पासून सुरू होणार आहेत. पहिला क्वालिफायर सामना २३ मे रोजी गुजरात आणि चेन्नई यांच्यात खेळवला जाईल, त्यानंतर २४ मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एलिमिनेटर सामना होईल. हे दोन्ही सामने चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. यानंतर दुसरा क्वालिफायर २६ मे रोजी आणि अंतिम सामना २८ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.