Ravindra Jadeja Outstanding Catch Video : मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा रंगतदार सामना सुरु आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने २० षटकात ८ विकेट्स गमावत १५७ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे सीएसकेला विजयासाठी १५८ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे. तत्पूर्वी, चेन्नईचा दिग्गज फिरकीपटू रविंद्र जडेजाने कॅमरून ग्रीनचा जबरदस्त झेल पकडून सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

जडेजाच्या गोलंदाजीवर ग्रीनने मोठा फटका मारल्याने चंडू थेट गोलंदाजाच्या दिशेनं वाऱ्यासारखा आला. त्याचदरम्यान जडेजाने तातडीनं अप्रतिम क्षेत्ररक्षण करत झेल पकडला. जर जडेजाने हा वेगवान चेंडू पकडला नसता, तर समोर असलेल्या अंपायरला चेंडू लागण्याची दाट शक्यता होती. चेंडूला चकवा देण्यासाठी अंपायरने थेट मैदानावरच उडी घेतली. या झेलचा व्हिडीओ इंडियन प्रीमियर लीगच्या ट्वीटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे.

नक्की वाचा – श्रेयस अय्यरने इफ्तार पार्टीत केली धमाल; युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माची इन्स्टाग्राम स्टोरी व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुंबई इंडियन्सची फलंदाजी पॉवर प्ले नंतर गडगडली. चेन्नईचा गोलंदाजांनी मुंबईच्या काही फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवले. रविंद्र जडेजाने भेदक गोलंदाजी करत चार षटकांत २० धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. तसंच तुषार देशपांडेने कर्णधार रोहित शर्माची दांडी गुल केली. रोहित २१ धावा करून तंबूत परतला. इशानने २१ चेंडूत ३२ धावांची खेळी साकारली. त्यानंतर टीम डेविड आणि तिलक वर्माने मुंबईचा डाव सावरला. तिलकने २२ तर टीम डेविडने ३१ धावा केल्या. मिचेल सॅंटनर आणि तुषार देशपांडेला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या. तर मगालाला एका विकेटवर समाधान मानावं लागलं.