Mumbai Indians vs Delhi Capitals, Playoffs Scenario IPL 2025: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज आयपीएल २०२५ स्पर्धेतील महत्वाचा सामना रंगणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. तर सामना सुरू होण्याच्या अर्ध्या तासाआधी म्हणजे ७ वाजता दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात येतील. हा सामना प्लेऑफमध्ये जाण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी दोन्ही संघांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. मुंबईत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे जर पाऊस पडला, तर प्लेऑफमध्ये कोण जाणार? जाणून घ्या.

सामन्याआधी दोन्ही संघांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये जाण्याची समान संधी आहे. मात्र पाऊस खोडा घालू शकतो. या सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता ही ८० टक्के इतकी असणार आहे. इतकी जास्त शक्यता असल्यास सामना होणं कठीण नाहीतर अशक्य असतं. मात्र पावसाने विश्रांती घेतली तर सामन्याला पुन्हा सुरूवात केली जाऊ शकते.

पावसामुळे सामना रद्द झाल्यास काय होणार?

हा सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांच्या टेन्शनमध्ये वाढ होणार आहे. कारण सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १–१ गुण दिला जाईल. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत १४ गुणांची कमाई केली आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत १३ गुणांची कमाई केली आहे. आतापर्यंत ३ संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर चौथ्या स्थानासाठी या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. सामना पावसामुळे रद्द झाल्यास मुंबईचे गुण १५ होतील. तर दिल्लीचा संघ १४ गुणांपर्यंत पोहोचेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे दोन्ही संघ आपला शेवटचा सामना पंजाब किंग्जविरुद्ध खेळणार आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्ज संघाला पराभूत करावं लागेल. असं झाल्यास मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. तर दुसरीकडे जर प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल, तर त्यांना पंजाबला पराभूत करावं लागेल आणि मुंबईचा संघ हरला पाहिजे अशी प्रार्थनाही करावी लागेल. पण जर हा सामना झाला, तर विजयी होणाऱ्या संघासाठी प्लेऑफचे दार उघडणार आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.