Jemimah Rodrigues Jaw Dropping Catch Viral Video : नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा दारुण पराभव केला. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दिल्लीच्या गोलदाजांनी मुंबईच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आणले. दिल्लीने भेदक मारा करून मुंबईला २० षटकांत १०९ धावांवर रोखलं. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली अन् मुंबईवर एकतर्फी विजय मिळवला.

फक्त ९ षटकात ११० धावा करून दिल्लीने मुंबईचा दारुण पराभव केला. शफाली वर्मा, कर्णधार मेग लॅनिंग आणि एलिस केप्सीने धडाकेबाज फलंदाजी केली. पण सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट ठरला तो जेमिमा रॉड्रिग्जने घेतलेल्या दोन झेलमुळंच. कारण मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि सलामीवीर फलंदाज हेली मॅथ्यूजचा जेमिमाने हवेत झेल पकडला अन् मुंबई इंडियन्सचा खेळ खल्लास केला. जेमिमाने घेतलेला या अप्रतिम झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा – MI-W vs DC-W : ‘मेग-एलिसची’ धडाकेबाज फलंदाजी; ९ षटकातच ११० धावांचं लक्ष्य गाठलं, मुंबईचा सलग दुसरा पराभव

इथे पाहा व्हिडीओ

शफाली वर्माने सुरुवातीलाच स्फोटक फलंदाजी केली. शफालीने १५ चेंडूत ३३ धावा कुटल्या. तर कर्णधार मेग लॅनिंग आणि एलिस केपसीनेही आक्रमक खेळी करत दिल्लीला विजयाच्या दिशेनं नेलं. मेगने २२ चेंडूत ३२ तर एलिसने १७ चेंडूत ३८ धावा कुटल्या. त्यामुळे दिल्लीने फक्त ९ षटकात ११० धावांचं लक्ष्य गाठून मुंबई इंडियन्सचा पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांवर दिल्लीने भेदक मारा केला. मारिझान कापने मुंबईच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना तंबूत पाठवलं. मारिझान काप, शिखा पांडे आणि जेस जोनासने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मुंबईने २० षटकांत ८ बाद १०९ धावाच केल्या. त्यामुळं दिल्लीला विजयासाठी ११० धावांचं लक्ष्य गाठावं लागणार होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.