Eng vs WI : Bio-security नियमांचा भंग, जोफ्रा आर्चरला संघातून वगळलं

जोफ्रा आर्चरनेही केली चूक मान्य

साऊदम्पटन येथील पहिली कसोटी संपल्यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या कसोटीसाठी मँचेस्टर येथे रस्ते मार्गाने रवाना झाला होता. प्रत्येक खेळाडूसाठी वेगळ्या गाडीची सोय इंग्लंड क्रिकेट बोर्डाने केलेली होती.

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली कसोटी गमावणाऱ्या इंग्लंडच्या संघाला आणखी एक धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चरने bio-security नियमांचा भंग केल्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटीसाठी संघातून वगळण्यात आलं आहे. ESPNCricinfo ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. आयसीसीनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

तब्बल ४ महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटने पुनरागमन केलं होतं. यावेळी आयसीसीने करोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक खेळाडूला नियम आखून दिले होते. ज्यात संघातील खेळाडूंना बाहेरील व्यक्तींशी संपर्कात येणं टाळायचं होतं. एखादा खेळाडू संघाबाहेरील व्यक्तीशी संपर्कात आल्यास त्याला काही दिवस स्वतःला क्वारंटाइन करणं अपेक्षित आहे. जोफ्रा आर्चरने नेमकं कोणत्या वेळी या नियमांचा भंग केला हे समजू शकलेलं नाहीये. पण खबरदारीचा उपाय म्हणून इंग्लंडने आर्चरला संघातून वगळलं आहे. आर्चरने घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगीरी व्यक्त करत स्वतःला क्वारंटाइन केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jofra archer has been left out of the second test after breaching bio secure protocols psd

ताज्या बातम्या