SA vs WI 2nd T20: जॉन्सन चार्ल्सने ३९ चेंडूत शतक ठोकत रचला इतिहास, अनेक विक्रम मोडताना गेललाही टाकले मागे

SA vs WI 2nd T20: वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघात दुसरा टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यात जॉन्सन चार्ल्सने झंझावाती शतक ठोकत अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

SA vs WI 2nd T20 Johnson Charles Updates
जॉन्सन चार्ल्स (फोटो-ट्विटर)

Johnson Charles breaks Chris Gayle’s record: दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सेंच्युरियनमध्ये दुसरा टी-२० सामना पार पडला. हा सामना दक्षिण आफ्रिका संघाने ६ गडी राखून जिंकला. तत्पुर्वी जॉन्सन चार्ल्सने झंझावाती शतक ठोकत इतिहास रचला. वेस्ट इंडिजसाठी सर्वात जलद टी-२० शतक झळकावणारा तो खेळाडू ठरला आहे. त्याने या बाबतीत अनुभवी खेळाडू ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. चार्ल्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३९ चेंडूत शतक ठोकले, तर ख्रिस गेलने ४७ चेंडूत वेस्ट इंडिजसाठी सर्वात वेगवान शतक ठोकले होते.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

जॉन्सन चार्ल्सने गेलला मागे टाकले –

सेंच्युरियनमध्ये खेळल्या जात गेलेल्या सामन्यात जॉन्सन चार्ल्सने काइल मेयर्ससह दुसऱ्या विकेटसाठी १३५ धावांची मोठी भागीदारी केली. चार्ल्सने ३९ चेंडूत शतक पूर्ण केले आणि ४६ चेंडूत ११८ धावा केल्या. ११८ धावांसह, त्याने सर्वात मोठे शतक करण्याच्या बाबतीत गेललाही मागे सोडले, गेलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ११७ धावा केल्या होत्या.

चार्ल्सने शतकासह हे विक्रम मोडीत काढले –

हेही वाचा – IPL 2023 सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने हातावर काढला नवीन टॅटू, बंगळुरूला पोहोचल्यानंतर फोटो व्हायरल

एकूण सर्व टी-२० मध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याबाबत बोलायचे झाले, तर जॉन्सन चार्ल्स आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. डेव्हिड मिलर, रोहित शर्मा, एस विक्रमसेकेरा यांच्यानंतर आता जॉन्सन चार्ल्सचे नाव आहे. वेस्ट इंडिजसाठी एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत चार्ल्सने ख्रिस गेलचीही बरोबरी केली आहे. पहिल्या क्रमांकावर एविन लुईस आहे, ज्याने एका डावात १२ षटकार ठोकले आहेत.

आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारे खेळाडू –

३५ – डेव्हिड मिलर, विरुद्ध बांगलादेश, पॉचेफस्ट्रूम, २०१७
३५ – रोहित शर्मा शर्मा, भारत विरुद्ध श्रीलंका, इंदूर, २०१७
३५ – एस विक्रमसेकेरा, झेक प्रजासत्ताक विरुद्ध तुर्की, इल्फोव्ह काउंटी, २०१९
३९ – जॉन्सन चार्ल्स, वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, २०२३
३९ – एस पेरियालवार, रोमानिया विरुद्ध तुर्की, इल्फोव्ह काउंटी, २०१९
३९ – झीशान कुकीखेल, हंगेरी विरुद्ध ऑस्ट्रिया, लोअर ऑस्ट्रिया, २०२२

वेस्ट इंडिजसाठी T20I डावात सर्वाधिक षटकार –

१२ – एविन लुईस विरुद्ध भारत, किंग्स्टन, २०१७
११ – ख्रिस गेल विरुद्ध इंग्लंड, मुंबई, २०१६
११- जॉन्सन चार्ल्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, आज
१० – ख्रिस गेल विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, २००७

हेही वाचा – WPL 2023 Final MI vs DC: रोहित शर्मासह ‘या’ खेळाडूंनी मुंबई इंडियन्सच्या महिला संघाला फायनलसाठी दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

टी-२० मध्ये वेस्ट इंडिजसाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या –

१२५* (६२) – एविन लुईस विरुद्ध इंडिया किंग्स्टन, २०१७
११८* (४५) – जॉन्सन चार्ल्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, आज
११७ (५७) – ख्रिस गेल विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, २००७
१०७ (५३) – रोव्हमन पॉवेल विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाउन, २००२
१००* (४८) – ख्रिस गेल विरुद्ध भारत, मुंबई, २०१६
१०० (४९) – एविन लुईस विरुद्ध भारत, लॉडरहिल, २०१६

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 22:45 IST
Next Story
WPL 2023 Final MI vs DC: शिखा-राधाने महिला टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास, शेवटच्या विकेटसाठी केली विक्रमी भागीदारी
Exit mobile version