भारताचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं आहे. इंग्लंडने उपांत्य फेरीत भारताचा पराभव केल्याने ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. इंग्लंडने भारताला १० विकेट राखत पराभूत केलं असून, अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने १६८ धावांचे आव्हान ठेवलं होतं. मात्र, जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. बटलरने ४९ चेंडूत ८० धावा तर, हेल्सने ४७ चेंडूत नाबाद ८६ धावा केल्या. दोन फलंदाजांच्या जोरावर १० विकेट्स राखत इंग्लडने भारताला पराभूत केलं आहे. मात्र, विश्वचषक स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर का पडला, याची कारणे जाणून घेणार आहोत.
हेही वाचा : दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच भारतही ऐनवेळी कच खाणारा संघ; २०१४ पासूनची ‘ही’ कामगिरीच आहे पुरावा
- फलंदाजीसाठी सलामीला उतरणाऱ्या खेळाडूंच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. केएल राहुल ६ पैकी ४ सामन्यात धावा काढण्यास असफल ठरला आहे. तर, विश्वचषकात रोहित शर्माच्या नावावर एकही अर्धशतक झळकलं नाही आहे. तसेच, पॉवरप्लेमध्ये भारताची फलंदाची सुद्धा वाईट होती.
- भारताचा वेगवान गोलंदाज जयप्रीत बुमराह दुखपतीमुळे बाहेर होता. त्याच्या जागी उमरान मलिकला विश्वचषक स्पर्धेसाठी संघात घेतले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची निवड झाल्याने उमरान मलिकला संघात संधी मिळण्याची शक्यता धुसर झाली.
- भारतीय संघातील काही खेळाडूंचे वय हा सुद्धा महत्वाचा विषय ठरत आहे. रोहित शर्माचे वय ३५, तर विराट कोहली ३४ वर्षाचा आहे. सूर्यकुमर यादव ३२ वर्षाचा, तर दिनेश कार्तिक ३७ वर्षाचा आहे. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार दोघेही ३२ वर्षाचे आहे. मात्र, विराट कोहली वगळता एकाही खेळाडूने समाधानकारण कामगिरी केली नाही.
हेही वाचा : पराभवानंतर मराठी अभिनेत्याचा भारतीय संघाला टोला, धोनीचा फोटो शेअर करत म्हणाला…
- ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने ६ सामने खेळले आहेत. यामध्ये फिरकीपटू युजवेंद्र चहलला एकाही सामन्यात खेळवण्यात आलं नाही. रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांना सहाही सामन्यात खेळण्यात आलं. पण, ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये फिरकीपटूंनी उत्तम कामगिरी केल्याचा इतिहास आहे.