KL Rahul Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला मँचेस्टरमध्ये सुरूवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना १००० धावा पूर्ण केल्या आहेत. असा कारनामा करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. यासह त्याने मोठ्या विक्रमात राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांची बरोबरी केली आहे.

असा विक्रम करणारा ठरला पाचवा भारतीय फलंदाज

या मालिकेत १-२ ने पिछाडीवर असलेला भारतीय संघ चौथा कसोटी सामना जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाकडून यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी आली. या दोघांनी मिळून सावध सुरूवात केली.यादरम्यान पहिल्या डावात १५ धावांचा पल्ला गाठताच त्याने इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह तो इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळताना १००० धावा करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. यावेळी केवळ ४ भारतीय फलंदाजांना असा कारनामा करता आला आहे. ज्यात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली आणि सुनील गावसकर यांनी हा कारनामा केला आहे.

इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळताना सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

सचिन तेंडुलकर- १५७५ धावा
राहुल द्रविड- १३७६ धावा
सुनील गावसकर- ११५२ धावा
विराट कोहली- १०९६ धावा
केएल राहुल- १०००* धावा

भारतीय संघात ३ बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मालिकेतील चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने ३ मोठे बदल केले आहेत. गेल्या सामन्यात आकाशदीप गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याच्या जागी अंशुल कंबोजला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. तर नितीश कुमार रेड्डीदेखील दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्याच्या जागी शार्दुल ठाकूरला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. तर मालिकेतील सुरूवातीच्या तिन्ही सामन्यात संधी मिळून फ्लॉप ठरलेल्या करूण नायरला प्लेइंग ११ मधून बाहेर करण्यात आलं आहे. त्याच्या जागी साई सुदर्शनला पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आलं आहे.