IND vs SA: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा टी-२० मालिकेमध्ये २-१ असा पराभव केल्यानंतर आजपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. ही मालिकाही तीन सामन्यांची आहे. या मालिकेची सुरुवात तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड मैदानावरील सामन्याने होणार आहे. सायंकाळी सात वाजल्यापासून या सामन्याला सुरुवात होणार असून भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेलं असेल. खास करुन भारतीय फलंदाज आणि त्यातही विराट कोहली कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचं विशेष लक्ष असेल. आशिया चषकापासून तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या विराटसाठी एक विशेष गोष्ट तिरुवनंतपुरमच्या मैदानाबाहेर वाट पाहत आहे. त्याचप्रमाणे भारतीय संघाचा कर्णधार असणाऱ्या रोहित शर्मालाही एक खास सप्राइज चाहत्यांनी दिलं आहे.

या मालिकेमध्येही विराटच्या कामागिरीवर संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. टी-२० विश्वचषका आधीची भारताची ही शेवटची मालिका असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमधील शेवटच्या सामन्यात विराटने दमदार अर्धशतक झळकावलं होतं. त्यामुळे हाच फॉर्म विराट आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही कायम राखेल अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे. विराटच्या फलंदाजीच सोशल मीडियावर तर कौतुक होतच आहे शिवाय प्रत्यक्षातही विराटच्या स्वागतासाठी तिरुवनंतपुरममधील चाहत्यांनी विशेष तयारी केली आहे.

अभिनेते असो खेळाडू असो किंवा राजकीय नेते असो आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना पाठिंबा देण्याच्या बाबतीत दाक्षिणात्य चाहत्यांचे हात कोणीच धरु शकत नाही. असाच एक प्रकार सध्या विराटबद्दल पहायला मिळत आहे. केरळमधील ‘द ऑल केरळ विराट कोहली फॅन’ या फॅन क्लबने भारताच्या या माजी कर्णधाराचं भव्य दिव्य कटआऊट ग्रीनफिल्ड स्टेडियमबाहेर उभारलं आहे. विराट सामना खेळण्यासाठी या मैदानात येणार असल्याने हे कटआऊट उभारण्यात आलं आहे.

१)

२)


केवळ विराटच नाही तर भारताचा कर्णधार रोहित शर्माचेही असे कट आऊट केरळमध्ये लावण्यात आलं आहे. मुंबई इंडियन्सने हा खास फोटो शेअर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील बऱ्याच काळापासून विराटला सातत्यपूर्ण कामिगीर करता येत नव्हती. त्यानंतर त्याने महिनाभर ब्रेक घेतला होता. भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना विराटने मात्र ब्रेक घेतला होता. त्यानंतर त्याने आशिया चषकापासून दमदार कामगिरी करत पुरनगामन केलं आहे. त्याने या स्पर्धेमध्ये २७६ धावा करत स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं. त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात १२२ धावा करत आपलं बहुप्रतिक्षित ७२ वं शतकं साजरं केलं होतं.