Lucknow Super Giants have added Lance Klusener : आयपीएलचा १७वा हंगाम २२ मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेपॉक येथे होणार आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे. सध्या फक्त २२ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत आयपीएलचे वेळापत्रक आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखेनंतरच उर्वरित वेळापत्रक समोर येईल. याआधी लखनऊ सुपर जायंट्स फ्रँचायझीने एक मोठा बदल केला आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एका माजी दिग्गजाने संघात प्रवेश केला आहे.
लखनऊ फ्रँचायझीने गुरुवारी निकोलस पुरनला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले होते. आता शुक्रवारी रात्री संघाच्या पथकात आणखी एक सहायक प्रशिक्षक दाखल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुजनर असे त्याचे नाव आहे. क्लुजनर संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि सहकारी सहाय्यक प्रशिक्षक एस. श्रीरामसह कोचिंग स्टाफसाठी काम करणार आहे. लान्स क्लुजनरला सहाय्यक प्रशिक्षक म्हणून संघात स्थान मिळाले आहे. या हंगामाच्या सुरुवातीला लखनऊने जस्टिन लँगरला मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवरच्या जागी करारबद्ध केले होते.
गौतम गंभीरनेही लखनऊची साथ सोडून केकेआरमध्ये प्रवेश केला आहे. लखनौचा संघ आयपीएलचा तिसरा हंगाम खेळणार आहे. हा संघ गेल्या दोन मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचला आहे, पण एकदाही फायनलमध्ये पोहोचू शकला नाही यावेळी संघाने जोरदार तयारी केली आहे. त्याचबरोबर संघातही अनेक बदल करण्यात आले आहेत. प्रशिक्षकापासून मेंटॉरपर्यंत सगळेच बदलले आहेत. त्यामुळे संघ मजबूत झाला आहे. आता फक्त कर्णधार केएल राहुल किती लवकर फिट होतो हे पाहणे बाकी आहे.
हेही वाचा – ऋषभ पंत आयपीएलच्या माध्यमातून करणार पुनरागमन; सौरव गांगुली यांनीच दिली माहिती
लखनऊ सुपर जायंट्सचे वेळापत्रक –
२४ मार्च- लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, जयपूर
३० मार्च- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स, लखनऊ
२ एप्रिल- आरसीबी विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, बंगळुरू
७ एप्रिल- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, लखनऊ
लखनऊ सुपर जायंट्सचा संपूर्ण संघ –
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन (उपकर्णधार), आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, रवी बिश्नोई, नवीन उल हक, कृणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, शामर जोसेफ, मयंक यादव आणि मोहसीन खान, शिवम मावी, एम. सिद्धार्थ, डेव्हिड विली, ॲश्टन टर्नर, अर्शीन कुलकर्णी आणि अर्शद खान.