IPL 2024 Mini auction will be held on December 19 in Dubai : इंडियन प्रीमियर लीगचा उत्साह पुन्हा एकदा वाढणार आहे. आयपीएल २०२४ ची तयारी जोरात सुरू आहे. सर्व संघांनी तयारी केली आहे. या हंगामासाठी मिनी लिलावही आयोजित करण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल २०२४ च्या लिलावाची तारीख आणि ठिकाण जाहीर केले आहे. आपल्या देशात आयपीएल लिलाव आयोजित न करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यंदा हा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे.

वास्तविक आयपीएलने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सुमारे ५ सेकंदांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आयपीएल लिलावाची तारीख आणि ठिकाण स्पष्ट केले आहे. आयपीएलचा लिलाव १९ डिसेंबरला दुबईत होणार आहे. यामध्ये लीगचे सर्व १० संघ सहभागी होणार आहेत. आयपीएल लिलावात एक हजाराहून अधिक खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यामध्ये ८०० हून अधिक भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

आयपीएलच्या मिनी लिलावासाठी ११६६ खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. संघांकडे एकूण ७७ जागा रिक्त आहेत. त्यापैकी ३० स्लॉट विदेशी खेळाडूंसाठी असतील. सर्व १० संघ सुमारे २६२.९५ कोटी रुपये खर्च करतील. जर आपण संघांवर नजर टाकली तर चेन्नई सुपर किंग्जकडे ६ जागा रिक्त आहेत. दिल्ली कॅपिटल्समध्ये ९ जागा रिक्त आहेत. गुजरात टायटन्सकडे ८ जागा रिक्त आहेत. कोलकाता नाईट रायडर्सकडे १२ जागा रिक्त आहेत.

हेही वाचा – MS Dhoni : माहीने आपल्या मित्राचा वाढदिवस केला साजरा, एकमेकांना केक भरवतानाचा VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लखनऊ सुपर जायंट्सकडे ६ स्लॉट रिक्त आहेत. मुंबई इंडियन्सकडे ८ जागा रिक्त आहेत. पंजाब किंग्जकडे ८ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे ६ स्लॉट रिक्त आहेत. राजस्थान रॉयल्सकडे ८ स्लॉट रिक्त आहेत. सनरायझर्स हैदराबादकडेही ६ स्लॉट उपलब्ध आहेत. या संघांमध्ये गुजरातच्या खिशात सर्वाधिक पैसा शिल्लक आहे. त्याच्याकडे ३८.१५ कोटी रुपये उपलब्ध आहेत.