न्यूझीलंडने या महिन्याच्या अखेरीस भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. तसेच न्यूझीलंडने आपला नियमित कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊथीला विश्रांती दिली आहे. भारताविरुद्ध २७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंडने मिचेल सँटनरची कर्णधार म्हणून निवड केली आहे.

केन विल्यमसन आणि टीम साऊथीला विश्रांती देण्याचा निर्णय फार पूर्वीच घेण्यात आला होता. तथापि, हे दोन्ही खेळाडू तंदुरुस्त राहिल्यास ते १८ जानेवारीपासून भारताविरुद्ध खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या वनडे संघाचा भाग असतील. डावखुरा मध्यमगती गोलंदाज बेन लिस्टर आणि हेन्री शिपले यांचा तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला १८ जानेवारीपासून हैदराबादमध्ये सुरुवात होणार आहे. त्यानंतर २७ जानेवारीला रांचीमध्ये पहिला टी-२० सामना होणार आहे. लिस्टरने गेल्या वर्षी भारतात ‘न्यूझीलंड अ’ संघातून पदार्पण केले होते. मात्र, न्यूमोनियाचा त्रास झाल्याने त्याला हा दौरा अर्धवट सोडून परतावे लागले होते.

हेही वाचा – IND vs SL 3rd ODI: भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यापूर्वी धक्का; ‘हा’ सदस्य बंगळुरुला रवाना

सँटनरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघात अनेक अनुभवी टी-२० खेळाडूंचा समावेश आहे. यातील नऊ खेळाडू गेल्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकात संघात होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंड संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेन क्लीव्हर, डेव्हन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल रिपन, हेन्री शिपले, ईश सोधी आणि ब्लेअर टिकनर.