scorecardresearch

IND vs SL 3rd ODI: भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यापूर्वी धक्का; ‘हा’ सदस्य बंगळुरुला रवाना

Rahul Dravid Health Updates: श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या वनडेआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांची प्रकृती खालावली असून तो एकटाच बंगळुरूला रवाना झाला आहे.

IND vs SL 3rd ODI: भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यापूर्वी धक्का; ‘हा’ सदस्य बंगळुरुला रवाना
भारतीय क्रिकेट संघ (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध मायदेशात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेवर कब्जा केला आहे. टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता शेवटचा सामना तिरुअनंतपुरममध्ये रविवारी (१५ जानेवारी) होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे.

मात्र या तिसऱ्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी सकाळी भारतीय संघ आणि उर्वरित सपोर्ट स्टाफ तिरुअनंतपुरमला तिसऱ्या सामन्यासाठी रवाना झाला. मात्र, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोलकाताहून थेट बंगळुरूला पोहोचला आहे.

द्रविड तिसऱ्या वनडेपूर्वी संघात सामील होणार –

सध्या राहुल द्रविडची प्रकृती ठीक नाही. त्यामुळेच तो बंगळुरूला रवाना झाला आहे. द्रविडला बीपीचा त्रास आहे, जो दुसऱ्या वनडेदरम्यान समोर आला होता. त्यानंतर बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती.

बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, काळजी करण्यासारखे काही नाही. ते शुक्रवारी पहाटे कोलकाताहून बेंगळुरूला रवाना झाले. पण तो पूर्णपणे फिट आहे. भारतीय संघ तिरुअनंतपुरममध्ये श्रीलंकेविरुद्ध मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. हा सामना रविवारी होणार आहे, पण त्याआधी म्हणजेच शनिवारीच द्रविड तिरुअनंतपुरममध्ये संघात सामील होईल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 15:36 IST

संबंधित बातम्या