WPL 2023 updates MI-W vs UPW-W : मुंबईच्या बेब्रॉन स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा १० वा सामना रंगला. यूपीची कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या यूपीच्या फलंदाजांची मुंबईच्या सायका इशाक आणि केरच्या भेदक गोलंदाजीनं पुरती दमछाक केली. पण कर्णधार अॅलिसा आणि तेहलियाने आक्रमक खेळी करून अर्धशकत ठोकलं. त्यामुळं यूपीच्या धावसंख्येचा आलेख चढता राहिला. यूपीने २० षटकांत ५ विकेट्स गमावत १५९ धावा केल्या. त्यानंतर १६० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांनी यूपीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला.

यास्तिका भाटिया, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि सिवर-ब्रंटच्या आक्रमक फलंदाजीमुळं यूपीचा दारुण पराभव झाला. हरमनप्रीतने ३३ चेंडूत ५३ धावा कुटल्या. यास्तिकाने २७ चेंडूत ४२ तर सिवरने ३१ चेंडूत ४५ धावांची खेळी साकारत मुंबईला महिला प्रीमियर लीगमध्ये सलग चौथा विजय मिळवून दिला. मुंबईने १७.३ षटकात २ गडी गमावर १६४ धावा करून यूपीचा पराभव केला.

युपीची फलंदांज किरण नवगिरेने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली होती. पण मुंबईची गोलंदाज अमेलिया केरने किरणच्या फलंदाजीला ब्रेक लावला. १७ धावांवर असताना यास्तिका भाटियाने किरणचा झेल घेतला. १३ षटकांच्या खेळानंतर यूपीची धावसंख्या ११३-२ अशी झाली होती. पण कर्णधार अॅलिसा हिली मैदानात तग धरुन होती. मागच्या सामन्यात अॅलिसाने आक्रमक खेळी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजच्या सामन्यातही अॅलिसा मोठी खेळी करत सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. त्यानंतर तेहलियाने अर्धशतकी खेळी केली. पण सायका इशाकच्या गोलंदाजीवर दोन्ही आक्रमक फलंदाज बाद झाले. कर्णधार अॅलिसाने ४६ चेंडूत ५८ धावा केल्या. तर तेहलियाने ३७ चेंडूत ५० धावा कुटल्या. १८ षटकानंतर १४६-५ अशी यूपीची धावसंख्या झाली होती. तर हेली मॅथ्यूजने सोफीला बाद करत यूपीला पाचवा धक्का दिला.