Shahid Afridi Danesh Kaneria Converting in Islam Controversy: पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर गंभीर आरोप केले आहेत. मी धर्मांतर करावे यासाठी आफ्रिदी प्रयत्न करत होता असं कनेरियाने म्हटलं आहे. ४२ वर्षीय दानिशने सांगितले की, आफ्रिदी व इतर खेळाडू त्याला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी खूप त्रास देत होते पण इंझमाम-उल-हक हा पाकिस्तानचा एकमेव कर्णधार होता ज्याने मला पाठिंबा दिला होता. यापूर्वी सुद्धा दानिशने पाकिस्तान संघाच्या कार्यपद्धतीवर, धोरणांवर टीका केली आहे. सामन्यापूर्वी सराव करण्यापेक्षा नमाज पठण करणं हे पाकिस्तान क्रिकेट संघासाठी महत्त्वाचं आहे अशी टीकाही कनेरियाने केली आहे.

आज तकला दिलेल्या मुलाखतीत, कनेरियाने त्याच्या कारकिर्दीत झालेल्या भेदभावाविषयी भाष्य केले होते. कनेरिया म्हणाला की, “शाहिद आफ्रिदी माझ्याशी सातत्याने धर्म परिवर्तनाबद्दल बोलायचा. मी माझ्या कारकिर्दीत चांगली कामगिरी करत होतो. इंझमाम-उल-हकने व शोएब अख्तरने मला खूप पाठिंबा दिला. मात्र शाहिद आफ्रिदी आणि इतर अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी मला खूप त्रास दिला. ते माझ्यासोबत जेवायचे नाही, सतत धर्मांतराबद्दल बोलायचे. पण माझा धर्म माझ्यासाठी सर्वस्व आहे, मी कट्टर सनातनी आहे. शाहिद आफ्रिदी हा मुख्य होता जो मला धर्मांतर करण्यास सांगत होता आणि त्याने अनेकदा तसे प्रयत्न केले होते.”

आज तकची ही पोस्ट शेअर करताना सुद्धा कनेरियाने धर्माशी कधीच तडजोड करू नका असेही लिहिले होते.

हे ही वाचा<< Danish Kaneria: “पाकिस्तान संघात धार्मिक भेदभाव नेहमीचाच” दानिश कनेरियाने जुना व्हिडीओ शेअर करत केला गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कनेरियाने पाकिस्तानचा सर्वाधिक विकेट पटकावणारा फिरकी गोलंदाज म्हणून आपली कारकीर्द गाजवली मात्र या कारकीर्दीत काही बहुचर्चित वादग्रस्त प्रसंग सुद्धा समाविष्ट आहेत. दानिश कनेरियावर २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाला होता, ज्यामध्ये तो दोषी आढळला होता. यानंतर पीसीबीने त्याच्यावर बंदी घातली होती.