Netherlands Breaks Team India’s 12 Year Old Record: नेदरलँड्स आणि स्कॉटलंड या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप लीग २ फेरीतील सामना पार पडला. या सामन्यात रेकॉर्ड्सचा पाऊस पडला. स्कॉटलंड संघाने ऐतिहासिक कामगिरी करत ३७० धावांचा यशस्वी पाठलाग केला. हा वनडे संघाच्या इतिहासातील तिसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग आहे. यासह नेदरलँड्स संघाने भारतीय संघाचा १२ वर्षांपूर्वीचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. भारतीय संघाने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध जयपूरच्या मैदानावर खेळताना २६० धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या स्कॉटलंड संघाकडून जॉर्ज मुनसेने १४ चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने १५० चेंडूंचा सामना करत १९१ धावांची वादळी खेळी केली. त्याला मॅथ्यू क्रॉसने चांगली साथ दिली. दोघांनी मिळून पाचव्या विकेटसाठी १५० धावा जोडल्या. या भागीदारीच्या बळावर स्कॉटलंड संघाने ५० षटकात ३६९ धावांचा डोंगर उभारला. ३६९ पैकी १९१ धावा हा एकट्या जॉर्ज मुनसेने केल्या.
वनडे क्रिकेटमध्ये ३७० धावांचा पाठलाग करणं हे, डोंगर चढण्यापेक्षा कमी नाही. सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या मायकल लेविट आणि मॅक्स ओ’डॉडने १० षटकात ६७ धावा करत दमदार सुरूवात करून दिली. दमदार सुरूवात मिळाल्यानंतर, उर्वरीत फलंदाजांनीही महत्वाचं योगदान दिलं. पाचव्या विकेटसाठी ओ’डॉड आणि निदामनुरू यांनी मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली.
ओ’डॉड शेवटपर्यंत खंबीर उभा राहिला. त्याने १३० चेंडूंचा सामना करत ४ षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने १५८ धावांची खेळी केली. शेवटी त्याला साथ देत नोआ क्रोसने २९ चेंडूत नाबाद ५० धावांची खेळी केली. शेवटच्या षटकातील ४ चेंडू शिल्लक ठेवून नेदरलँडने दिलेलं आव्हान पूर्ण केलं.
वनडे क्रिकेटच्या इतिहासात नेदरलँड्स पहिल्यांदाच ३०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला. या ऐतिहासिक कामगिरीसह नेदरलँड्स संघाने भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. याआधी इंग्लंड संघाने वेस्टइंडिजविरूद्ध झालेल्या सामन्यात ३६१ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. हा सामना इंग्लंडने ६ गडी राखून आपल्या नावावर केला होता.त्यानंतर भारतीय संघाने मायदेशात खेळताना ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या सामन्यात ३७० धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.