पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये परतण्याची हीच योग्य संधी – अक्रम

उपखंडातीलच नव्हे तर जगभरातील चाहत्यांना आयपीएलशी जोडण्याकरिता पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी आयपीएलमध्ये परतण्याची हीच योग्य संधी आहे,

उपखंडातीलच नव्हे तर जगभरातील चाहत्यांना आयपीएलशी जोडण्याकरिता पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी आयपीएलमध्ये परतण्याची हीच योग्य संधी आहे, असे पाकिस्तानचा माजी कर्णधार वासिम अक्रमला वाटते.
‘‘भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेटपटू एकमेकांविरुद्ध किंवा एकत्र खेळतात, तेव्हा अनेक चाहते स्टेडियमकडे आकर्षित होतात. संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशात आयपीएलला चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा मिळेल. पाकिस्तानमध्ये भरपूर गुणवत्ता असल्यामुळे भविष्यात पाकिस्तानी क्रिकेटपटूंनाही आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे. सईद अजमल, उमर अकमल, उमर गुल आणि शाहीद आफ्रिदीसारख्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी चाहतेही हजेरी लावतील,’’ असे कोलकाता नाइट रायडर्सचा गोलंदाजी प्रशिक्षक असलेल्या अक्रमने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Present opportunity comfortable for pakistani cricketers to return in ipl akram

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या