रणजी ट्रॉफी २०२२-२३मध्ये पृथ्वी शॉ याने ऐतिहासिक खेळी केली आहे. त्याने या स्पर्धेत बुधवारी (११ जानेवारी) आसाम विरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील पहिले त्रिशतक झळकावले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने ही तुफानी शतकी खेळी केली. याबरोबर तो रणजी ट्रॉफीच्या इतिहासात मुंबईकडून सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारा पहिला फलंदाजही ठरला आहे. त्याने ३२६ चेंडूतच ३०० धावांचा टप्पा गाठला.

भारतीय संघातून धावबाद होत असलेला स्टार सलामीवीर पृथ्वी शॉच्या बॅटने पुन्हा एकदा धावा करत ऐतिहासिक विक्रम केला आहे. २३ वर्षीय पृथ्वी शॉनेही आपल्या खेळीने बीसीसीआयच्या निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफी २०२२-२३ हंगामात एक मोठा विक्रम केला आहे. मुंबई संघाकडून खेळताना पृथ्वी शॉने आसामविरुद्धच्या सामन्यात ३७९ धावांची खेळी केली होती. गुवाहाटी येथील अमीनगाव क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. पृथ्वी शॉने ४०० धावांचा ऐतिहासिक आकडा गाठला आहे. त्याला आसामच्या रियान परागने त्याला पायचीत केले. या सामन्यात शॉने मुशीर खानसोबत पहिल्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी आणि रहाणेसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४०१ धावांची भागीदारीही केली.

MS Dhoni Only Given Limited Batting In CSK Trainer Explains Why
MS धोनीला शेवटच्याच षटकांमध्ये फलंदाजी देण्याचं कारण अखेरीस आलं समोर; प्रशिक्षक म्हणाले, “त्याचे शॉट्स..”
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद

पृथ्वी शॉने ३८२ चेंडू खेळून ३७९ धावा केल्या. म्हणजेच त्याचा स्ट्राईक रेट जवळपास १०० च्या बरोबरीचा होता. या खेळीत त्याने ४९ चौकार आणि ४ षटकार मारले. या खेळीमुळे त्याने रणजी ट्रॉफीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी खेळणाऱ्या संजय मांजरेकरचा ३२ वर्षे जुना विक्रम मोडला. मांजरेकर यांनी १९९१ मध्ये हैदराबादविरुद्ध मुंबईकडून खेळताना ३७७ धावा केल्या होत्या.

या सामन्यात पृथ्वी शॉचा रणजी ट्रॉफीतील सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम हुकला. भाऊसाहेब निंबाळकर यांच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला आहे. निंबाळकर यांनी १९४८-४९ मध्ये महाराष्ट्राकडून खेळताना काठीवाडविरुद्ध ४४३ धावांची नाबाद खेळी केली होती. मात्र, त्याच्या खेळीमुळे शॉने अनेक दिग्गजांची रणजी करंडकातील सर्वोच्च धावसंख्या पार केली. त्याने विजय मर्चंट (३५९), व्हीव्हीएस लक्ष्मण (३५३), चेतेश्वर पुजारा (३५२) आणि सुनील गावसकर (३४०) या दिग्गजांना मागे टाकले.

एक खास विक्रमही केला

आपल्या या अप्रतिम खेळीमुळे पृथ्वी शॉने देशांतर्गत क्रिकेटमध्येही अनोखा विक्रम केला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शतक, विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक आणि रणजी ट्रॉफीमध्ये तिहेरी शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू आहे. सध्या, गेल्या एक वर्षापासून पृथ्वी शॉ देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे, तरीही त्याला भारतीय संघात स्थान मिळवता आलेले नाही.

हेही वाचा: IND vs AUS Test Series: भारत दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीतून बाहेर होऊ शकतो

रणजी करंडकातील सर्वोच्च धावसंख्या

1. बी.बी. निंबाळकर – ४४३* धावा, महाराष्ट्र – वि. काठियावाड (१९४८)

2. पृथ्वी शॉ – ३७९ धावा, मुंबई – वि. आसाम (२०२३)

3. संजय मांजरेकर – ३७७ धावा, बॉम्बे – वि. हैदराबाद (१९९१)

4. एमव्ही श्रीधर – ३६६ धावा, हैदराबाद – आंध्र विरुद्ध (१९९४)

5. विजय मर्चंट – ३५९* धावा, बॉम्बे – महाराष्ट्र विरुद्ध (१९४३) -. सुमित गोहेल – ३५९* धावा, गुजरात – ओडिशा विरुद्ध (२०१६)