scorecardresearch

Prithvi Shaw: “संघ व्यवस्थापनाने याचे उत्तर द्यावे…”, पृथ्वी शॉला संधी न मिळाल्याने भारताचा माजी खेळाडू संतापला

भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉबद्दल दिग्गजांमध्ये अनेकदा वाद होत असतात. पृथ्वी शॉने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. यावर बीबीसीआय काय निर्णय घेत हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Prithvi Shaw: Team management should answer this question Murali Vijay furious over Prithvi Shaw not getting a chance
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

Murali Vijay on Prithvi Shaw: सध्या भारतीय संघातील एका जागेबाबत खेळाडूंमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. अलीकडेच, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत व्यवस्थापनाने केएल राहुलला वगळले आणि शुबमन गिलला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले. संधीचा फायदा घेत शुबमन गिलने चौथ्या कसोटी सामन्यातही शतक झळकावले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांची बरसत घातल्यानंतरही त्याला संधी न मिळाल्याने अनेक जण प्रश्न उपस्थित करतात. आता या यादीमध्ये भारतीय संघाचा माजी सलामीवीर मुरली विजय याचा देखील समावेश झाला आहे.

पृथ्वी शॉने भारताकडून शेवटचा सामना जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. या वर्षाच्या सुरुवातीला, न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी त्याचा भारताच्या संघात समावेश करण्यात आला होता, परंतु या कालावधीत त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. चाहत्यांना आता शॉ आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसेल. देशांतर्गत स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडू पृथ्वी शॉला भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी मिळालेली नाही. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू मुरली विजयने पृथ्वी शॉबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

हेही वाचा: IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून श्रेयस अय्यर बाहेर, सॅमसन, हुडा की रजत; कोणाला लागणार लॉटरी?

मला शुबमन आणि पृथ्वी दोन्ही आवडतात- मुरली विजय

२०२१ मध्ये पृथ्वी शॉ भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत पृथ्वीला निश्चितपणे संघात स्थान मिळाले होते, परंतु तो प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळवू शकला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी वन डे मालिकेसाठी पृथ्वी शॉला संघात स्थान मिळालेले नाही. दरम्यान, भारताचा माजी खेळाडू मुरली विजय टीम इंडियामध्ये पृथ्वीच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसला. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना मुरली विजय म्हणाला, “तो का खेळत नाही हे मला समजत नाही. याबाबत व्यवस्थापनाकडून विचारणा करावी लागेल. सतत असे दुर्लक्ष करणे हे एखाद्या खेळाडूवर अन्याय करण्यासारखे आहे.”

मुरली विजय पुढे म्हणाला, “अलीकडे १५ सुपरस्टार भारतासाठी खेळत आहेत. जर तुम्ही भारतासाठी खेळत असाल तर तुम्ही माझ्यासाठी आधीच सुपरस्टार आधीच आहात. पण कौशल्यानुसार, मला शुबमन गिल आणि पृथ्वी शॉ खूप आवडतात, मी दोघानाही संघात ठेवेन. ऋषभ पंतनेही उत्तम खेळ दाखवला असून श्रेयस अय्यरही चांगली कामगिरी करत आहे.”

हेही वाचा: MS Dhoni: ‘असली पिक्चर अभी बाकी है!’ IPLपूर्वी सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी बनला ‘रॉकस्टार’, माहीचा भन्नाट Video व्हायरल

केएल राहुलच्या खराब फॉर्मवर मुरली विजयने हे सांगितले

केएल राहुलच्या खराब फॉर्मबद्दल बोलताना मुरली विजय म्हणाला, “कमबॅक करण्यासाठी त्याला काय करावे लागेल हे राहुलला ठाऊक आहे. मला वाटते केएलला एकटे सोडले पाहिजे. हे कोणत्याही क्रिकेटपटूच्या बाबतीत घडते. केएलला त्याच्या मूलभूत गोष्टींवर काम करणे आवश्यक आहे. दमदार पुनरागमन करण्यासाठी त्याने यावेळी काम केले पाहिजे.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 21:29 IST
ताज्या बातम्या