मकाऊ बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

सिंधूसमोर जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असणाऱ्या चीनच्या चेन युफेईचे आव्हान असणार आहे.

पी.व्ही. सिंधू

जेतेपद कायम राखण्याच्या उद्देशाने खेळणाऱ्या पी.व्ही. सिंधूसह एच. एस. प्रणॉय आणि बी. साईप्रणीत यांनी मकाऊ बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.
दोन वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या पाचव्या मानांकित सिंधूने इंडोनेशियाच्या लिंडावेनी फॅनेट्रीवर २१-१७, २१-१८ असा विजय मिळवला. पुढच्या लढतीत सिंधूसमोर जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असणाऱ्या चीनच्या चेन युफेईचे आव्हान असणार आहे.
पुरुष गटात सातव्या मानांकित प्रणॉयने चीनच्या क्विओ बिनला १२-२१, २१-११, २१-९ असे नमवले. एक तास आणि पाच मिनिटे झालेल्या लढतीत प्रणॉयने दिमाखदार खेळ करत विजय साकारला. पुढच्या लढतीत त्याच्यासमोर १६व्या मानांकित एहसान मौलाना मुस्तोफाचे आव्हान असणार आहे. साईप्रणीतने इंडोनेशियाच्या आंद्रे कुर्निवान तेडजोनोचा २१-१५, २१-६ असा पराभव केला. पुढच्या फेरीत साईप्रणीतची लढत मलेशियाच्या गोह सून हुआतशी होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pv sindhu enters macau open badminton quarters