Ravichandran Ashwin thanked MS Dhoni : रविचंद्रन अश्विनची गणना जगातील महान फिरकीपटूंमध्ये केली जाते. तो कॅरम बॉलसाठी प्रसिद्ध आहे, जो कोणत्याही फलंदाजाला खेळणे सोपे नाही. अश्विन २००८ ते २०१५ या कालावधीत आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या आयपीएल २०११ च्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीने दाखवलेला विश्वास आर अश्विन अजूनही विसरलेला नाही. ज्याने त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा दिली आणि यासाठी तो स्वत:ला माजी भारतीय कर्णधाराचा ऋणी समजतो.

धोनीने पहिले षटक दिले होते अश्विनला –

अपारंपरिक योजना बनवण्यात पटाईत असलेल्या महेंद्रसिंग धोनीने २०११ च्या आयपीएल फायनलमध्ये नवा चेंडू रविचंद्रन अश्विनकडे सोपवला होता. त्यावेळी या उदयोन्मुख ऑफस्पिनरने चौथ्या चेंडूवर फॉर्मात असलेल्या ख्रिस गेलची विकेट घेतली होती. चेन्नई सुपर किंग्जसाठी चेपॉकमधील ती जादूई रात्र अश्विनसाठी नुकतीच सुरुवात होती आणि तेव्हापासून, दशकभराच्या कारकीर्दीत त्याने १०० कसोटी सामने खेळले आहेत आणि कसोटीत ५१६ बळी घेतले आहेत.

नुकतेच तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने अश्विनला त्याच्या कामगिरीबद्दल एक कोटी रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमात अश्विन भावूक होऊन म्हणाला, “मी सहसा माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधत नाही. येथे येऊन या सन्मानाबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे.” त्याच्या पहिल्या आयपीएल कर्णधार धोनीला श्रेय देताना अश्विन म्हणाला, “२००८ मध्ये मी चेन्नई सुपर किंग्जच्या ड्रेसिंग रूममध्ये सर्व महान खेळाडू मॅथ्यू हेडन आणि एमएस धोनीला भेटलो. त्यावेळी मी काहीच नव्हतो आणि मुथय्या मुरलीधरन ज्या संघात होता त्या संघात मी खेळत होतो.”

हेही वाचा – २०२३ च्या विश्वचषकापूर्वी खेळपट्टीशी छेडछाड? रोहित शर्मा, द्रविडचे नाव घेत कैफचा मोठा दावा

‘मी धोनीचा सदैव ऋणी राहीन’

अश्विन पुढे म्हणाला, “धोनीने मला जे काही दिले. त्यासाठी मी आयुष्यभर त्याचा ऋणी राहीन. त्याने मला नवीन चेंडूने ख्रिस गेल समोर गोलंदाजी करण्याची संधी दिली होती. आता १७ वर्षांनंतर अनिल भाई या घटनेबद्दल बोलणार आहेत.” चेन्नई संघाने २००८ मध्ये अश्विनचा स्थानिक फिरकी गोलंदाज म्हणून समावेश केला होता, पण मुरलीधरनमुळे त्याला एकही सामना मिळाला नाही. चेन्नईचा हा ३७ वर्षीय गोलंदाज स्वत:मध्ये सातत्याने सुधारणा करत इथपर्यंत पोहोचला.

हेही वाचा – WPL 2024: फायनलमध्ये होणार तीन मोठे विक्रम, ‘हे’ तीन खेळाडू रचू शकतात इतिहास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या अश्विन राजस्थानकडून खेळतोय –

अश्विन आयपीएल २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. अश्विनने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आत्तापर्यंत १९७ सामने खेळले असून १७१ विकेट्स घेण्यात त्याला यश आले आहे. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचा समावेश होतो. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्याने २००९ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने आपला पहिला आयपीएल सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळला होता.