IND vs AUS, WTC 2023 Final : ट्रेविस हेडने पहिल्या इनिंगमध्ये १६३ धावांची शतकी खेळी केली होती. या धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ४६९ धावांपर्यंत मजल मारली होती. पहिल्या इनिंगमध्ये ट्रेविस आखूड टप्प्याच्या चेंडूवर बाद झाला होता. पहिल्या इनिंगमध्ये हेड जेव्हा फलंदाजी करत होता, तेव्हा त्याला बाऊन्सर फेकण्याची रणनिती भारतीय संघाने खूप उशिराने आखली होती. ज्यामुळे या फलंदाजाला शतक ठोकण्यात यश मिळालं. परंतु, दुसऱ्या इनिंगमध्ये हेडचा कमकुवतपणा समजून भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच चेंडूपासून बाऊन्सर फेकण्याची रणनिती आखली. त्यानंतर कांगांरु फलंदाज पूरणणे डगमगल्याचं पाहायला मिळालं. मात्र, दुसऱ्या इनिंगमध्ये हेड बाऊन्सर किंवा शॉर्ट चेंडूवर बाद झाला नाही. पण भारतीय गोलंदाजांच्या रणनितीत तो फसला.

भारताच्या वेगवान गोलंदाजांनी ट्रेविसला शॉर्ट चेंडू फेकण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे त्याला बिंधास्तपणे फलंदाजी करता येत नव्हती. अशातच रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात हेड बाद झाला. जडेजाच्या फिरकीने कमाल केल्याने हेड २७ चेंडूत १८ धावाच करू शकला. जडेजाने गोलंदाजी करून स्वत:च हेडचा झेल पकडला. त्याआधी हेडने जडेजाला एक षटकारही ठोकला होता.

नक्की वाचा – WTC Final 2023 : रवींद्र जडेजाने रचला इतिहास, ‘या’ दिग्गज खेळाडूचा विक्रम मोडून इंग्लंडमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात जडेजाला खेळपट्टीचा खूप फायदा झाला. खेळपट्टीवर पायांचे निशाण लागल्याने जडेजाने त्याच लाईनवर गोलंदाजी केली. ज्यामुळे त्याचे चेंडू टर्न होण्यास मदत झाली. याच कारणामुळं हेडला जडेजाने फेकलेल्या चेंडूचा अंदाज घेता आला नाही आणि त्याने कोणतीही सावध खेळी न करता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पंरतु, चेंडू थेट जडेजाकडे गेला आणि त्याने झेल पकडला.