scorecardresearch

Premium

विराट कोहलीच्या क्रिकेटमधील भविष्याबाबत सचिन तेंडुलकरचं महत्त्वाचं विधान; म्हणाला, “त्याचा प्रवास थांबला..”

Sachin Tendulkar On Virat Kohli Future: विराट कोहली १० डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेआधी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून ब्रेक घेणार असल्याचे समजत आहे.

Sachin Tendulkar Big Statement About Virat Kohli Future after Kohli Informs BCCI Taking Break From IND vs SA T20 and ODI
सचिन तेंडुलकरने विराट कोहलीचं मनसोक्त कौतुक करत महत्त्वाचं विधान केलं आहे (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Sachin Tendulkar On Virat Kohli’s Future: विराट कोहलीचे विश्वचषक विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न नुकत्याच संपलेल्या २०२३ च्या हंगामात अपूर्ण राहिले असले तरी किंग कोहलीने जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या मनात आपले स्थान पक्के केले आहे. भारताच्या माजी कर्णधाराने क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे अनेक रेकॉर्ड्स तोडले. कोहलीने टूर्नामेंटचा शेवट तब्बल ७६५ धावांसह केला, आणि अशा प्रकारे विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. यापूर्वी २००३ च्या विश्वचषकात सचिन तेंडुलकरने ६०३ धावा केल्या होत्या. याशिवाय तेंडुलकरच्या ४९ शतकांचा विक्रम सुद्धा कोहलीने आपल्या नावे केला. यानंतर सचिन तेंडुलकरने सुद्धा आपल्या जुन्या सहकाऱ्याचं मनसोक्त कौतुक केलं. सचिनने आता एका मुलाखतीत बोलताना विराट कोहलीच्या क्रिकेटमधील भविष्याविषयी भाष्य केलं आहे.

तेंडुलकरने ESPNCricinfo सह बोलताना म्हणाला की, “विराटला भारताकडून खेळण्याआधीही मी पाहिले आहे. मी त्याला मोठं होताना पाहिले आहे, आणि मग तोच खेळाडू देशासाठी अशा अद्भुत गोष्टी साध्य करतो हे पाहून मला खूप आनंद झाला आहे. आणि मला खात्री आहे त्याचा प्रवास थांबला नाहीये. त्याच्या मनात अजून बरंच क्रिकेट (प्रेम) शिल्लक आहे आणि त्याने अजून खूप धावा करणं शिल्लक आहे. धावांची भूक आणि देशासाठी आणखी काही साध्य करण्याची इच्छा त्याच्यात कायम टिकून राहावी. हा विक्रम भारताकडेच कायम आहे याचा मला आनंद आहे. धावांचा विक्रम भारताचा आहे असे मी नेहमी म्हणत आलो आहे आणि अजूनही तेच म्हणेन.”

sunil gavaskar supports rohit sharma
कसोटी क्रिकेटसाठी दृढनिश्चय आवश्यक! रोहित शर्माच्या वक्तव्याचे गावस्करांकडून समर्थन
Sunil Gavaskar Big Statement About Virat Kohli
Virat Kohli : ‘…तो आयपीएलही खेळणार नाही’, किंग कोहलीबद्दल सुनील गावसकरांचं मोठं वक्तव्य
india vs england 3rd test playing xi sarfaraz jurel set for debut
अननुभवी मधल्या फळीची कसोटी! भारत इंग्लंड तिसरा सामना आजपासून; सर्फराज, जुरेलच्या पदार्पणाची शक्यता
Jasprit Bumrah First Reaction Slams Critics With Hard Post After Becoming Number One Test Cricket Bowler IND vs ENG Highlights
जसप्रीत बुमराहची ‘त्या’ ऐतिहासिक कामगिरीनंतर पहिली प्रतिक्रिया; सणसणीत उत्तर देत टीकाकारांना लावली चपराक

हे ही वाचा<< “त्या लोकांची दूरदृष्टी..”, सुनील गावसकरांची ‘सचिन’साठी खास पोस्ट; तेंडुलकरची ‘कमेंट’ गुगली ठरली लक्षवेधी

दरम्यान, तेंडुलकरने विश्वचषकाच्या वेळी सुद्धा विराट कोहलीची एक खास आठवण शेअर करत त्याचे अभिनंदन केले होते. कोहली जेव्हा पहिल्यांदा ड्रेसिंग रूममध्ये आला होता तेव्हा बाकीच्या खेळाडूंनी गमतीत त्याला माझा आशीर्वाद घेण्यासाठी पाया पडायला सांगितले होते. विराट बरोबर मी ड्रेसिंग रूम शेअर केली आहे आणि त्याची नवी प्रगती अभिमानास्पद आहे असेही तेंडुलकरने म्हटले होते.

दुसरीकडे, विराट कोहली १० डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेआधी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून ब्रेक घेणार असल्याचे समजत आहे. विराट कोहलीने बीसीसीआयला याबाबत कळवले असल्याचे वृत्त इंडियन एक्सस्प्रेसने दिले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sachin tendulkar big statement about virat kohli future after kohli informs bcci taking break from ind vs sa t20 and odi svs

First published on: 30-11-2023 at 12:01 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×