scorecardresearch

Premium

Rinku Singh: ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये रिंकू सिंगचा जलवा! सैयामी-अभिषेकला ६ लाख ४० हजारांसाठी विचारला ‘हा’ प्रश्न

Kaun Banega Crorepati: आयपीएल २०२३ मध्ये सलग पाच चेंडूत पाच षटकार मारणारा रिंकू सिंग केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही चर्चेत आला. आता त्याच्याशी संबंधित एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Rinku Singh's Question on Kaun Banega Crorepati Show
सैयामी-अभिषेक आणि रिंकू सिंग (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Rinku Singh’s Question on Kaun Banega Crorepati Show: रिंकू सिंगने शुक्रवारी आयर्लंडविरुद्ध टी20 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. मात्र, त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणाऱ्या रिंकूने २०२३ च्या मोसमात गुजरात टायटन्सविरुद्ध सलग पाच षटकार मारून इतिहास रचला. यानंतर तो केवळ मैदानावरच प्रकाशझोतात आला नाही, तर मैदानाबाहेरही तो खूप चर्चेत आहे. या एपिसोडमध्ये तो ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोचाही एक भाग बनला होता. तो स्वतः शोमध्ये पोहोचला नाही, पण प्रश्नांच्या माध्यमातून शोचा एक भाग बनला.

खरंतर, सध्या अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर ‘घूमर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. सैयामी या चित्रपटात एका क्रिकेटपटूच्या भूमिकेत आहे, जिला एक हात नाही आणि तरीही ती धैर्याने क्रिकेट खेळते. त्याचबरोबर अभिषेक बच्चन हा तिचा प्रशिक्षक आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशात सैयामी आणि अभिषेकची जोडी प्रसिद्ध टेलिव्हिजन शो ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये प्रमोशनसाठी पोहोचली होती. या शोमध्ये होस्ट अमिताभ बच्चन यांनी त्यांना क्रिकेटविषयी प्रश्न विचारला.

India vs Australia Cricket Score Updates in Marathi
IND vs AUS, World Cup 2023: शानदार इनिंग खेळूनही विराट दिसला नाराज, कपाळावर मारुन घेतानाचा VIDEO व्हायरल
man carrying heavy tray of breads on his head while cycling in busy traffic in egypt people surprised watch
भररस्त्यात डोक्यावर मोठा ब्रेडचा ट्रे ठेवून सायकल चालवतोय ‘हा’ व्यक्ती, तरुणाचा बॅलन्स पाहून व्हाल थक्क!
Lucky man got Rs 13 thousand 311 crores
याला म्हणतात नशीब! खरेदीसाठी सुपरमार्केटमध्ये गेला अन् क्षणात १३ हजार ३११ कोटींचा मालक झाला
People looted Apple store in America
जमावाने चक्क Apple स्टोअर लुटलं, महिलेने सुरु केलं थेट प्रक्षेपण, आयफोन घेऊन पळणारे लोक कॅमेऱ्यात कैद

सैयामीने खेरने अचूक उत्तर देत जिंकले ६ लाख ४० हजार –

६ लाख ४० हजारांसाठी अमिताभ यांनी सैयामी आणि अभिषेक यांना रिंकू सिंगशी संबंधित प्रश्न विचारला. प्रश्न होता ‘कोलकाता नाईट रायडर्सच्या कोणत्या फलंदाजाने आयपीएल २०२३ मध्ये एका सामन्याच्या शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारले?’ याबरोबरच चार पर्याय देण्यात आले होते, ज्यामध्ये आंद्रे रसेल, रिंकू सिंग, नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यर यांची नावे होती. यावर सैयामीने रिंकूचे नाव घेत अचूक उत्तर देत ६ लाख ४० रुपये जिंकले. या प्रश्नाचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या शोमध्ये घूमरच्या टीमने १२ लाख ५० हजार रुपये जिंकले.

सैयामी-अभिषेक यांना खेळाशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले –

या शोमध्ये सैयामी आणि अभिषेकला खेळाशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले. ते चॅरिटीसाठी खेळत असल्याने, दोघांनाही सहाव्या स्तरावरून प्रश्न विचारण्यात आले, म्हणजेच २०,००० रुपयांपासून प्रश्नांची फेरी सुरू झाली. पहिलाच प्रश्न विचारला गेला की २०२३-२४ हंगामाच्या सुरुवातीला चेल्सी फुटबॉल क्लबचे व्यवस्थापक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? थॉमस टुचेल, कार्लो अँसेलोटी, एरिक टेन हाग आणि मॉरिसिओ पोचेटिनो हे पर्याय होते. यावर फुटबॉल फॅन अभिषेकने पोचेटिनोचे नाव घेतले, ते योग्यच होते.

हेही वाचा – Mohammad Naeem Sheikh: आशिया चषकाच्या तयारीसाठी बांगलादेशी क्रिकेटपटू आगीवर अनवाणी पायाने चालताना दिसला, VIDEO होतोय व्हायरल

रिंकूने शुक्रवारी केले आंतरराष्ट्रीय पदार्पण-

रिंकूने शुक्रवारी पदार्पण केले, पण त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने १४० धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, भारतीय डाव सुरु असताना सुरु झाल्याने खेळ थांबवला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल लागला. पावसामुळे खेळ थांबेपर्यंत भारताने ६.५ षटकात २ गडी गमावून ४७ धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईस पद्धतीनुसार, भारत आयर्लंडच्या बरोबरीच्या धावसंख्येपेक्षा दोन धावांनी पुढे होता. अशा स्थितीत टीम इंडियाने दोन धावांनी विजय मिळवला. आता भारत आणि आयर्लंड यांच्यातील पुढील टी-२० सामना २० ऑगस्ट रोजी होणार आहे. दोन विकेट घेणारा जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Saiyami and abhishek won 640 thousand in the name of rinku singh in the kaun banega crorepati show vbm

First published on: 19-08-2023 at 15:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×