India vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनादरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने सामन्यातील दोन्ही डावात दमदार शतकं झळकावली आहेत. यासह तो कसोटी क्रिकेटमधील एकाच डावात दोन शतकं झळकावणारा आशियातील पहिलाच तर जगातील दुसरा यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने इंग्लंडसमोर ३७१ धावांचं मोठं आव्हान ठेवलं आहे. दरम्यान या खेळीनंतर लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका यांनी ऋषभ पंतचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे.

पहिल्या डावात शतक झळकावल्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने दमदार शतकी खेळी केली. यादरम्यान केएल राहुलसोबत मिळून त्याने चौथ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी केली. या डावात फलंदाजी करताना त्याने आक्रमक फलंदाजी करण्यासह बचावात्मक फलंदाजी देखील केली. ९८ ते १०० धावांचा पल्ला गाठायला त्याने १४ चेंडू खेळून काढले.

या खेळीनंतर संजीव गोयंका यांनी त्याचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी ऋषभ पंतचा फोटो शेअर करत लिहिले की, ” ऋषभ पंत धाडसी, आक्रमक, हुशार. लागोपाठ दोन शतकं, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही डावात शतक करणारा दुसरा यष्टिरक्षक फलंदाज.”

या दोन मोठ्या रेकॉर्डवर कोरलं नाव

ऋषभ पंत पहिल्याच सामन्यातील दोन्ही डावात शतकं झळकावली आहेत. यासह तो कसोटी क्रिकेटमधील दोन्ही डावात शतकं झळकावणारा आशियातील पहिलाच यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे. तर जगातील दुसरा यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे. याआधी हा रेकॉर्ड अँडी फ्लॉवर यांच्या नावावर होता. त्यांनी २००१ मध्ये हा विक्रम आपल्या नावावर केला होता. आता ऋषभ पंतने अँडी फ्लॉवर यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. यासह ऋषभ पंत हा एकाच सामन्यात दोन शतकं झळकावणारा आशियातील पहिलाच यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऋषभ पंतने या डावात केलेली खेळी भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची ठरली. ऋषभने या डावात फलंदाजी करताना ११८ तर केएल राहुलने १३७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर दोन्ही फलंदाजांनी १९५ धावा जोडल्या. भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे आव्हान ठेवले आहे.