शिखर धवन, शुबमन गिल अन् ईशान किशनची झिम्बाब्वेत धमाल; Video बघून तुम्हालाही आवरणार नाही हसू

Shikhar Dhawan Hilarious Dance Video: सलामीवीर शिखर धवन सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतो.

शिखर धवन, शुबमन गिल अन् ईशान किशनची झिम्बाब्वेत धमाल; Video बघून तुम्हालाही आवरणार नाही हसू
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. गुरुवारपासून (१८ ऑगस्ट) दोन्ही देशांदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघाने हरारेमध्ये जोरदार सराव सुरू केला आहे. या सरावाशिवाय काही खेळाडू मस्ती करण्याच्या मूडमध्ये आहेत. संघाचा उपकर्णधार शिखर धवन यामध्ये आघाडीवर आहे. त्याने ईशान किशन आणि शुबमन गिलसह एक मजेशीर व्हिडिओ तयार करून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

अनुभवी सलामीवीर शिखर धवन सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतो. विनोदी व्हिडिओ पोस्ट करून तो आपल्या चाहत्यांना हसवण्याचे काम करतो. झिम्बाब्वेविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी शिखर धवनने शुबमन गिल आणि ईशान किशनसह एका पंजाबी गाण्यावर विनोदी डान्स केला आहे.

“हांजी बिबा, किद्दा?”, अशा कॅप्शनसह शिखरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांची भरपूर पसंती मिळत आहे. आतापर्यंत लाखो चाहत्यांनी व्हिडिओ लाईक केला आहे. याशिवाय, भारतीय संघातील अनेक खेळाडूंनीही व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. कर्णधार केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी खळखळून हसणारे इमोजी कमेंटमध्ये टाकले आहेत. तर, गोलंदाज मोहम्मद सिराजने ईशान किशनचे कौतुक केले आहे.

हेही वाचा – ICC 2023-27 Schedule: येत्या पाच वर्षांत होणार तब्बल ७७७ क्रिकेट सामने; आयसीसीने जाहीर केले पुरुष क्रिकेटचे वेळापत्रक

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाला १८ ते २२ ऑगस्ट दरम्यान झिम्बाब्वेमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी आधी शिखर धवनला कर्णधार करण्यात आले होते. मात्र, केएल राहुल फिटनेस चाचणी उत्तीर्ण होताच निवडकर्त्यांनी धवनच्या जागी त्याची नियुक्ती केली. धवनकडे उपकर्णधारपद असेल. मालिकेतील सर्व सामने हरारे येथील ‘हरारे स्पोर्ट्स क्लब’च्या मैदानावर होणार आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shikhar dhawan shares hilarious dance video with shubman gill and ishan kishan on instagram vkk

Next Story
ICC 2023-27 Schedule: येत्या पाच वर्षांत होणार तब्बल ७७७ क्रिकेट सामने; आयसीसीने जाहीर केले पुरुष क्रिकेटचे वेळापत्रक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी