scorecardresearch

Premium

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलचे ब्रेकअप? दोघांच्या ‘या’ कृतीमुळे चर्चांना उधाण

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या डेटिंगच्या अनेक वर्षांपासून चर्चा आहेत.

sara shubhaman
सारा आणि शुभमनच्या ब्रेकअपची सध्या जोरदार चर्चा आहे

सारा तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल यांच्यात बिनसल्याचं कळतंय. त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या सध्या जोरदार चर्चेत आहेत, त्यामागचं कारण म्हणजे शुभमन गिल आणि साराने एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. पण सारा अजूनही शुभमनच्या बहिणीला इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहे. त्यामुळे या दोघांचं ब्रेकअप झालंय की बिनसलंय, याबद्दल नेटकरी वेगवेगळे अंदाज बांधत आहेत.

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या डेटिंगच्या बातम्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहेत. दोघांनी या बातम्यांना कधीच दुजोरा दिला नाही, पण दोघेही सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करताना दिसले. एवढंच नाही तर जेव्हा जेव्हा शुभमनने क्रिकेटच्या मैदानावर चांगली कामगिरी केली तेव्हा सारा त्याचं कौतुक करताना दिसली. यावरून दोघांच्या अफेअर आणि डेटिंगच्या चर्चा होत्या.

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
mrinal kulkarni virajas and shivani
“शिवानी आणि विराजस, तुम्ही दोघेही…,” मृणाल कुलकर्णींनी व्यक्त केला आनंद, जाणून घ्या खास कारण

हेही वाचा – आलियावर केलेल्या ‘त्या’ विनोदाबद्दल रणबीरने मागितली जाहीर माफी; म्हणाला, “माझ्या चेहऱ्यावरील हावभाव…”

सारा आणि शुभमन पहिल्यांदा २०१९च्या आयपीएल गेम्समध्ये एकत्र दिसले होते. तेव्हा शुभमन कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता. आयपीएलनंतर शुभमनने त्याची पहिली कार रेंज रोव्हर खरेदी केली होती. त्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावर साराने हार्ट इमोजीसह कमेंट करून त्याचे अभिनंदन केले होते. तेव्हापासून सारा आणि शुभमनच्या अफेअरची चर्चा सुरू झाली.

हेही वाचा – दिग्दर्शक राजामौलींना ‘या’ दिग्गज अभिनेत्यासोबत करायचंय काम; मुलाखतीत बोलून दाखवली इच्छा

नुकतीच टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर गेली होती. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शुभमन गिलने शानदार शतक झळकावले होते. २२ ऑगस्ट रोजी हरारे येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात त्याने ९७ चेंडूत १३० धावांची शानदार खेळी खेळली. यावेळी गिलने १५ चौकार आणि एक षटकार मारला. हे शतक झळकावून त्याने सचिन तेंडुलकरचा २४ वर्ष जुना विक्रम मोडला होता. 

हेही वाचा – “माइक टायसन मला सेटवर इंग्रजीत शिव्या द्यायचा”; विजय देवरकोंडाचा खुलासा

भारताने ही मालिका ३-० ने जिंकली. या दौऱ्यात शुभमनने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने त्याच्या कारकिर्दीतील पहिले शतक या दौऱ्यावर झळकावले. त्यानंतर पुन्हा एकदा शुभमन आणि सारा यांच्या अफेअरच्या बातम्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या. अशात आता दोघानींही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलंय. त्यामुळे त्यांचा ब्रेकअप झालाय, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. आता या दोघांच्या अफेअर आणि ब्रेकअपच्या बातम्यांमध्ये किती तथ्य आहेत, याबद्दल त्या दोघांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shubhman gill sara tendulkar unfollow each other on instagram break up rumours hrc

First published on: 25-08-2022 at 18:32 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×