Shubman Gill Record: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ३५८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. बेन स्टोक्स आणि जो रूटच्या शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने ६६९ धावांचा भलामोठा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला सुरूवातीला २ मोठे धक्के बसले. पण त्यानंतर कर्णधार शुबमन गिल आणि केएल राहुलने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. यादरम्यान शुबमन गिलने एक मोठा विक्रम मोडून काढला आहे.

शुबमन गिल या मालिकेत दमदार फॉर्ममध्ये आहे. मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने दमदार शतकं झळकावली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. पण चौथ्या सामन्यात त्याला पुन्हा एकदा सूर गवसला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात स्वस्तात माघारी परतल्यानंतर त्याने दुसऱ्या डावात महत्वूपर्ण खेळी केली. यासह तो इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळताना सर्वाधिक धावा करणारा आशियातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.

शुबमन गिलने या विक्रमात पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफचा विक्रम मोडून काढला आहे. मोहम्मद युसूफच्या नावे ६३१ धावा करण्याची नोंद होती. त्याने २००६ मध्ये इंग्लंडविरूद्ध खेळताना ७ डावात ६३१ धावा केल्या होत्या. या यादीत राहुल द्रविड तिसऱ्या स्थानी आहे. २००२ मध्ये झालेल्या इंग्लंड दौऱ्यावर राहुल द्रविडने ६०२ धावा केल्या होत्या. तर विराट कोहलीने २०१८ मध्ये ५९३ धावा केल्या होत्या. सुनील गावसकर यांनी १९७९ मध्ये ५४२ धावा केल्या होत्या.

इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना आशियातील सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

शुबमन गिल – ८ डावात ६३२ धावा, भारत (२०२५)
मोहम्मद युसूफ – ७ डावात ६३१ धावा, पाकिस्तान (२००६)
राहुल द्रविड- ६ डावात, ६०२ धावा,भारत (२००२)
विराट कोहली – १० डावात ५९३ धावा, भारत (२०१८)
सुनील गावसकर- ७ डावात ५४२ धावा, भारत (१९७९)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासह शुबमन गिलच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने इंग्लंडविरूद्ध फलंदाजी करताना एकाच डावात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीला मागे सोडलं आहे. कर्णधार म्हणून शुबमन गिलने ६६८ धावांचा पल्ला गाठला आहे. याआधी हा विक्रम भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर होता. विराट कोहलीने २०१६-१७ कसोटी मालिकेत ६५५ धावा केल्या होत्या. इंग्लंडविरूद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा सुनील गावसकरांच्या नावावर आहे. लवकरच गिल हा विक्रम देखील मोडून काढू शकतो.