Sourav Ganguly’s Choose All-Time XI and Drops Virat Kohli: भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची गणना महान क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. त्याने भारतासाठी ११३ कसोटीत ७२१२ धावा आणि ३११ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११,३६३ धावा केल्या आहेत. गांगुलीने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गांगुलीने बीसीसीआयचे अध्यक्षपदही भूषवले आहे. त्याच्या कार्यकाळातच विराट कोहलीला कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर गांगुली आणि विराटचे नाते खूपच खराब झाले होते.

सौरव गांगुलीने आपली सर्वकालीन इलेव्हन निवडली तेव्हाही त्याचा प्रभाव दिसून आला. त्याने विराट कोहलीला आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले नाही. विराट हा स्टार क्रिकेटपटूंपैकी एक आहे आणि सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा तो फलंदाज आहे.दरम्यान, सौरव गांगुलीचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर पुन्हा समोर आला आहे. जिथे त्याने लॉर्ड्स क्रिकेट यूट्यूब चॅनेलवर त्याच्या सर्वकालीन इलेव्हनचे नाव सांगितले आहे. हा व्हिडीओ काही वर्षे जुना आहे, पण तो इंटरनेटवर पुन्हा आला आणि व्हायरल होत आहे. गांगुलीने विराट कोहलीकडे दुर्लक्ष केल्याने चाहते खूश नाहीत.


पण हे खरे आहे की गांगुलीने विराट कोहलीला त्याच्या ऑल टाइम इलेव्हनमध्ये घेतलेले नाही, ज्यामध्ये चार ऑस्ट्रेलियन, दोन श्रीलंकेचे, दोन दक्षिण आफ्रिकेचे आणि एक इंग्लिश खेळाडूचा समावेश आहे, तर भारताचे फक्त दोन खेळाडू आहेत. याशिवाय गांगुलीने आपला अष्टपैलू खेळाडू म्हणून जॅक कॅलिसची निवड केली आहे. दादांनी कुमार संगकाराला यष्टिरक्षक म्हणून ठेवले आहे.

सौरव गांगुली म्हणाला की, त्याने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची गोलंदाजी आणि विकेट घेण्याच्या क्षमतेमुळे त्याचा दुसरा वेगवान गोलंदाजी पर्याय म्हणून निवड केली. त्याच्या व्यतिरिक्त त्याने ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न आणि मुथय्या मुरलीधरन यांची निवड केली आहे.

हेही वाचा – ICC Test Rankings: कसोटी क्रमवारीत रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाचा दबदबा कायम, रोहित शर्माही टॉप १० मध्ये दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सौरव गांगुलीची सर्वकालीन इलेव्हन: मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया), अॅलिस्टर कुक (इंग्लंड), राहुल द्रविड (भारत), सचिन तेंडुलकर (भारत), जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका), कुमार संगकारा (श्रीलंका-विकेटकीपर), रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया – कर्णधार), ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया), डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका), शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया), मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका).