माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना सध्या दोहा येथे आयोजित लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळत असून इंडिया महाराजा संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. ३६ वर्षीय डाव्या हाताच्या फलंदाजाने २०२० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सुरेश रैनाने बुधवारी एलएलसी २०२३ मध्ये भारत महाराजासाठी चांगली खेळी खेळली, चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत संघासाठी ४९ धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणारा ठरला.

रैनाने ही खेळी ४१ चेंडूत खेळली आणि यादरम्यान त्याने ३ षटकार आणि २ चौकार मारले. रैनाच्या या खेळीच्या जोरावर इंडिया महाराजा संघाने १३६ धावा केल्या होत्या, मात्र ख्रिस गेलच्या ५७ धावांच्या खेळीने तीन विकेट्स शिल्लक असताना १३७ धावांपर्यंत मजल मारली आणि सामना जिंकला. या लीगमध्ये इंडिया महाराजाने मागील चारपैकी तीन सामने गमावले असून या संघाचे केवळ २ गुण आहेत आणि हा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. तरीही या संघाला पुढे जाण्याची आणि विजेतेपद मिळविण्याची संधी आहे. इंडिया महाराजाचे नेतृत्व गौतम गंभीर करत आहे ज्याने चौथ्या सामन्यात खेळला नसला तरी सलग तीन अर्धशतके झळकावली. गंभीरशिवाय सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा यांनीही आतापर्यंत आपल्या फलंदाजीने प्रभावित केले आहे. उथप्पाने ३९ चेंडूत ८८ धावा केल्यानंतर तिसऱ्या सामन्यातही नाबाद राहिला होता.

Shubman Gill Future India Captain, Suresh Raina Claims
IPL 2024 : हार्दिक किंवा पंत नव्हे, तर ‘हा’ २४ वर्षीय खेळाडू असू शकतो भारताचा भावी कर्णधार, ‘मिस्टर आयपीएल’चे वक्तव्य
miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?

बुधवारी सुरेश रैनाने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत संवाद साधण्यासाठी आला आणि यादरम्यान एका पत्रकाराने त्याला विचारले की, “तू वर्ल्ड जायंट्सविरुद्ध चांगली खेळी केलीस त्यानंतर आता तू आयपीएलमध्ये पुनरागमन करावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे.” या प्रश्नावर सुरेश रैनाने मजेशीर उत्तर दिले आणि हसत हसत सांगितले की, “मी शाहिद आफ्रिदी नसून सुरेश रैना आहे आणि मी निवृत्ती घेतली आहे.”

१५ ऑगस्ट २०२० रोजी सेवानिवृत्ती घेतली

भारतीय संघासाठी आक्रमक फलंदाजी करणाऱ्या सुरेश रैनाने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या १५ मिनिटांनी त्याने निवृत्ती जाहीर केली. धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी क्रिकेटलाही अलविदा केला. वाचकांच्या माहितीसाठी पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी आपल्या खेळाच्या कारकिर्दीत अनेक वेळा निवृत्ती घेतल्यानंतर पुन्हा मैदानात परतला आहे. त्यामुळेच रैनाने त्याचा संदर्भ वापरला.

हेही वाचा: Afridi On Akhtar: “तो पाकिस्तानचा अर्थमंत्री बनेल…”, शाहिद आफ्रिदीने शोएब अख्तरची जाहीरपणे उडवली खिल्ली

गौतम गंभीर सर्वाधिक धावा करणारा आहे

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर हा लीगमधील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तीन सामन्यांत १५६.४१ च्या स्ट्राइक रेटने १८३ धावा करून तो गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. लीगमध्ये १५०+ धावा करणारा गौतम गंभीर हा एकमेव खेळाडू आहे. याशिवाय रॉबिन उथप्पा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ४ सामन्यात १७६.८१ च्या स्ट्राईक रेटने १२२ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर सुरेश रैनाने ११६.३९ च्या स्ट्राईक रेटने एकूण ७१ धावा केल्या आहेत.