scorecardresearch

IND vs AUS 3rd ODI: सलग तिसऱ्यांदा पहिल्याच चेंडूवर बाद होत सूर्याने नोंदवला लाजिरवाणा विक्रम; पाहा गोल्डन डक खेळाडूंची यादी

Suryakumar Yadav Embarrassing Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सूर्यकुमार यादवने लाजिरवाणा विक्रम नोंदवला आहे. तो सलग तीन सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे.

Suryakumar Yadav has registered an embarrassing record
भारत विरुद्धऑस्ट्रेलिया (फोटो-संग्रहित छायाचित्र जनसत्ता)

IND vs AUS 3rd ODI Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे मालिकेतील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी जिंकला आहे. यासह कांगारू संघाने मालिकाही २-१ अशी जिंकली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २७० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडिया २४८ धावांवर गडगडली आणि सामना गमावला. या सामन्यात सूर्यकुमार यादवला पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यामुळे सलग तीन सामन्यांत गोल्डन डक होणाऱ्या सूर्याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.

सूर्यकुमार यादव टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला नंबर वन फलंदाज असेल, पण किमान तीन सामन्यांच्या मालिकेत खेळताना तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये बाद होणे त्याच्या कारकिर्दीतील एक मोठा धब्बा असेल. असे कोणत्याही क्रिकेटपटूसोबत घडलेले नसून सूर्याच्या नावावर हा लाजिरवाणा विक्रम नोंदवण्यात आला आहे. चेन्नईत झालेल्या सामन्यात सूर्याला अॅश्टन अगरने क्लीन बोल्ड केले. आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या सलग तीन डावात पहिल्याच चेंडूवर बाद होणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

उजव्या हाताचा फलंदाज सूर्यकुमार यादव पहिल्या दोन सामन्यात चौथ्या क्रमांकावर उतरला होता. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत त्याला संधी मिळाली, पण त्याचा फायदा त्याला घेता आला नाही. त्याच वेळी, तिसऱ्या सामन्यात तो ७ व्या क्रमांकावर उतरला होता. तिथेही तो पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा बळी ठरला. मात्र, सलग तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये गोल्डन डक होणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे, असे नाही.
सूर्याच्या अगोदर हा विक्रम १९९४ मध्ये सचिन तेंडुलकर, १९९६ मध्ये अनिल कुंबळे, २००३-०४ मध्ये झहीर खान, २०१०-११ मध्ये इशांत शर्मा आणि २०१७-१९ मध्ये जसप्रीत बुमराहच्या नावावर होता. तथापि, सूर्यकुमार यादव हा एकमेव खेळाडू आहे, जो वनडे मालिकेतील तीनही सामन्यांमध्ये ० धावांवर बाद झाला.

हेही वाचा – IND vs AUS 3rd ODI: चेन्नईमध्ये डेव्हिड वार्नरने रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारा ११वा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला

आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, सलग तीन गोल्डन डक नोंदवणारा यादव जगातील १४वा फलंदाज ठरला. या यादीत अॅलेक स्टीवर्ट, अँड्र्यू सायमंड्स आणि शेन वॉटसन यांच्या नावांचा समावेश आहे.

१.टोनी ब्लेन (१९८६) न्यूझीलंड
२.अॅलेक स्टीवर्ट (१९८९-९०) इंग्लंड
३.इयान ब्लॅकवेल (२००३) इंग्लंड
४.निकोलस डी ग्रूट (२००३) कॅनडा
५.वुसी सिबांडा (२००३) झिम्बाब्वे
६.तिनशे पण्यांगारा (२००३) झिम्बाब्वे
७.अँड्र्यू सायमंड्स (२००३) ऑस्ट्रेलिया
८.ब्रेट ली (२००९) ऑस्ट्रेलिया
९.शेन वॉटसन (२००९) ऑस्ट्रेलिया
१०.जेम्स नोचे (२०१०) केनिया
११.देवेंद्र बिशू (२०११) वेस्ट इंडिज
१२.अॅलेक्स कुसॅक (२०१२-१३) आयर्लंड
१३.ब्लेसिंग मुजारबानी (२०२१) झिम्बाब्वे
१४.सूर्यकुमार यादव (२०२३) भारत

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 22:51 IST

संबंधित बातम्या