भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाच्या फिरकीपटूंची कमान आर आश्विनच्या हाती असणार आहे. या मालिकेत टीम इंडियाला त्याच्याकडून खूप अपेक्षा असणार आहेत. या तयारी दरम्यान, तो सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे. अशा परिस्थितीत नुकतेच व्हायरल होत असलेल्या एका तरुणीच्या प्रश्नाला त्याने मजेशीर उत्तर दिले आहे.
टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन अनेकदा त्याच्या वक्तव्यांमुळे आणि कमेंट्समुळे चर्चेत असतो. आता आश्विन पुन्हा एकदा अशाच गोष्टीसाठी चर्चेत आला आहे. व्हायरल होत असलेल्या एका तरुणीच्या प्रश्नाला त्याने मजेशीर उत्तर दिले आहे. त्याचे हे उत्तर सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.
वास्तविक, एका तरुणीने ट्विटरवर प्रश्न विचारला होता की, मुलांना फक्त एकच गोष्ट हवी असते, जी ‘बी’ ने सुरू होते? याचे उत्तर आर अश्विनने दिले असून ते आता व्हायरल झाले आहे. मुलीच्या ट्विटला रिट्विट करत आर अश्विनने ट्रॉफी आणि आनंदी इमोजीसह लिहिले, “बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी”. या रिप्लायची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ फेब्रुवारीपासून चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज अॅलन बॉर्डर आणि भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या नावावरून या मालिकेचे नाव काही वर्षांपूर्वी ठेवण्यात आले होते. त्यामुळेच त्यांनी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा उल्लेख बी असा केला आहे.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , उमेश यादव , जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ:
पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार) मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन आणि डेव्हिड वॉर्नर