Wankhede Stadium Top 5 batsmen with most Test runs : आता चकचकीत स्पोर्ट्स क्लब, आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडासंकुले होत असली, तरी ऐतिहासिक जेतेपदांचे साक्षीदार असलेल्या वानखेडे स्टेडियमला क्रिकेटप्रेमींच्या मनात मानाचे स्थान आहे. धावांचा डोंगर, फटकेबाजी अन् चेंडूची जादू अनुभवलेल्या या स्टेडियमने पाहता पाहता अर्धशतकी खेळी केली आहे. या स्टेडियमचा सुवर्णमहोत्सवी सोहळा रविवारपासू सुरु झाला आहे. त्या निमित्ताने आज आपण या स्टेडियमवर कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.

वानखेडे स्टेडियमवर भारताने आतापर्यंत २७ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये भारताने १२ जिंकले आहेत आणि टीम इंडियाला ८ पराभव पत्करावे लागले आहेत. याशिवाय ७ कसोटी सामने अनिर्णित राहिले. अशा परिस्थितीत वानखेडे स्टेडियमवर कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ५ फलंदाजांबद्दल जाणून घेऊया. विशेष म्हणजे यादीत पाचही फलंदाज भारतीय आहेत. त्याहून महत्त्वाचे या यादीतील पहिले तीन फलंदाज हे मुंबईकर आहेत.

सुनील गावस्कर (१,१२२) –

सुनील गावसकर यांनी वानखेडे मैदानावर कसोटी खेळताना सर्वाधिक धावा केल्या होत्या. गावस्करांनी ११ सामन्यांच्या २० डावांमध्ये ५६.१० च्या सरासरीने १,१२२ धावा केल्या आहेत, ज्यात ५ शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. गावस्कर यांनी १९७५ मध्ये या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला होता.

हेही वाचा – Champions Trophy 2025 : ऋषभ पंत की संजू सॅमसन, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात कोणाला मिळणार संधी? घ्या जाणून

सचिन तेंडुलकर (९२१) –

वानखेडेवर सर्वाधिक कसोटी धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनने ११ सामन्यांच्या १९ डावात ४८.४७ च्या सरासरीने ९२१ धावा केल्या आहेत. या कालावधीत तो एक शतक आणि ८ अर्धशतके झळकावण्यात यशस्वी ठरला. मुंबईच्या मैदानावर त्याची सर्वोत्तम धावसंख्या १४८ धावा आहे.

दिलीप वेंगसरकर (६३१) –

दिलीप वेंगसरकर हे वानखेडेवर सर्वाधिक धावा करणारे तिसरे खेळाडू आहेत. वेंगसाकरांनी या मैदानावर एकूण १० कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी १७ डावात फलंदाजी करताना ६३१ धावा केल्या आहेत, ज्यात त्यांची सरासरी ४८.५३ आहे. वेंगसाकरांनी या मैदानावर दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. या मैदानावर नाबाद १६४ ही वेंगसरकरांची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

हेही वाचा – Shubman Gill : ‘हेअरस्टाइलवर नव्हे तर फलंदाजीवर लक्ष दे…’, अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘या’ भारतीय फलंदाजाला फटकारले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल द्रविड (६१९) आणि सय्यद किरमाणी (४७७) –

राहुल द्रविड यांनी या मैदानावर ७ कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्यांनी १३ डावात फलंदाजी करताना ६१९ धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. येथे त्यांनी ५६.२७ च्या सरासरीने धावा करण्यात यशस्वी ठरले आहेत. तसेच सय्यद किरमाणीने या मैदानावर ४७७ धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. १०२ धावा ही किरमाणीची सर्वोत्तम धावसंख्या आहे.