Nine players made their international debut for different countries today : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या सामन्यातून रजत पाटीदारला भारताकडून कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. त्याचबरोबर इतर देशातील काही खेळाडूंनी आज आपापल्या देशासाठी पदार्पण केले. यामध्ये एकूण ९ खेळाडूंचा समावेश आहे.
टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने हस्ते रजत पाटीदारला पदार्पणाची कॅप मिळाली आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रजत पाटीदारला टीम इंडियासाठी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याचबरोबर इंग्लंड संघासाठी शोएब बशीरने पदार्पण केले आहे. इंग्लंडकडून पदार्पण करणाऱ्या युवा शोएब बशीरने आपल्या कसोटी कारकिर्दीतील रोहित शर्माची पहिली विकेट घेतली.
लान्स मॉरिसला ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघात आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे, तो आपल्या सहकारी नवोदित झेवियर बार्टलेटसह अगदी वेगळ्या ऑस्ट्रेलियाच्या वेगवान आक्रमणात सामील झाला आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघात आजपासून एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तानसाठी नूर अली झाद्रानने कसोटी पदार्पण केले आहे. त्याने इब्राहिम झद्रानसह अफगाणिस्तानच्या डावाला सुरुवात केली.
आठवी कसोटी खेळत असलेल्या अफगाणिस्तानकडे चार पदार्पणवीर आहेत. स्पिन-बॉलिंग अष्टपैलू झिया-उर-रहमानसह वेगवान गोलंदाज मोहम्मद सालेम आणि १८ वर्षीय नवीन झाद्रान आपली पहिली कसोटी खेळत आहेत. आपली पहिली कसोटी खेळणारा अनुभवी मर्यादित षटकांचा सलामीवीर नूर अली झद्रान याने अब्दुल मलिकच्या जागी स्थान मिळवले आहे. श्रीलंकेनेही वेगवान गोलंदाज चमिका गुणसेकराला पदार्पण करण्याची संधी दिली आहे, ज्याने राष्ट्रीय सुपर लीग चार दिवसीय स्पर्धेच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये छाप पाडली होती.
आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे खेळाडू –
रजत पाटीदार, शोएब बशीर, लान्स मॉरिस, झेवियर बार्टलेट, नूर अली जद्रान, झिया अकबर, सलीम सैफी, नावेद झद्रान, चमीक गुणसेकरा