Tushar Deshpande wishes MS Dhoni on Guru Purnima : भारतात आज २१ जुलै हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजर केला जात आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या गुरुबद्द कृतज्ञता व्यक्त करत आहे. अशात भारताचा युवा गोलंदाज तुषार देशपांडेने आपले वडिल आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तुषारने आपल्या इन्स्टा स्टोरीवर वडिलांबरोबर धोनीचा फोटोही शेअर केला आहे. या फोटोवर तुषारने संस्कृतमध्ये एक श्लोकही लिहिला आहे.

वास्तविक तुषार देशपांडेने आपल्या यशाचे श्रेय त्याचे वडील आणि एमएस धोनी यांना दिले आहे. तुषार देशपांडेने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेसाठी खेळतो. धोनीने तुषारला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे आणि त्याला एक चांगला क्रिकेटर बनण्यास मदत केली आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुषार देशपांडेने एमएस धोनीबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यावर केले होते आंतरराष्ट्रीय पदार्पण –

तुषारने नुकतेच झिम्बाब्वे दौऱ्यावर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पाच सामन्यांच्या या मालिकेतील चौथ्या सामन्यात या वेगवान गोलंदाजाने पदार्पण केले. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू साईराज बहुतुलेने त्याला पदार्पणाची कॅप दिली होती. यावेळी तुषार देशपांडेची पत्नीही उपस्थित होती. या दौऱ्यात त्याने दोन सामन्यांत एकूण दोन विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – MS Dhoni : “जब लगे लात पड़ने वाली है…”, धोनीच्या निवृत्तीच्या प्लॅनबद्दल मोहम्मद शमीचा मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुषार देशपांडेची आयपीएल २०२४ मधील कामगिरी –

आयपीएल २०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर तुषार देशपांडेला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. वेगवान गोलंदाज सीएसकेसाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांपैकी एक होता. डेथ ओव्हर्समध्ये त्याच्या वेगवान गोलंदाजीच्या क्षमतेने सर्वांना प्रभावित केले. तुषार आयपीएलच्या १७व्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक होता. वेगवान गोलंदाजाने सुमारे आठच्या इकॉनॉमीमध्ये १७ विकेट्स घेतल्या होत्या.