दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी (SA vs IND) टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. वनडे मालिकेबाबतही रोहितच्या समावेशाबद्दल अजूनही साशंकता आहे. थ्रोडाउन स्पेशालिस्ट राघवेंद्रसमोर फलंदाजी करताना रोहित शर्माला दुखापत झाल्याची माहिती आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्मा या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर ट्विटरवर लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. विदेशी दौऱ्यावर जाताना रोहितला दुखापत होते, असे म्हणत लोकांनी त्याची खिल्ली उडवली आहे.

बीसीसीआयने ट्वीट करून या मोठ्या बातमीची माहिती दिली आहे. रोहित शर्माच्या जागी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेला भारत ‘अ’ संघाचा कर्णधार प्रियांक पांचाळला टीम इंडियाच्या कसोटी संघात स्थान मिळाले आहे. भारतीय संघ १६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होऊ शकतो. याआधी खेळाडूंना तीन दिवस मुंबईत क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे.

रोहित मालिकेबाहेर गेल्यानंतर नेटिझन्सनी त्याला ट्रोल केले आहे.

हेही वाचा – धक्कादायक..! रवींद्र जडेजा घेणार निवृत्ती; लवकरच होणार अधिकृत घोषणा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियांक पांचाळने अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नाही. पण या ३१ वर्षीय फलंदाजाला चांगला अनुभव आहे. त्याने १०० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४६ च्या सरासरीने ७०११ धावा केल्या आहेत. त्याने २४ शतके आणि २५ अर्धशतके केली आहेत.