Who is The Hero of USA Win Ali Khan? बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही अमेरिकेने ६ धावांनी विजय मिळवला.या सामन्यात अमेरिकेच्या अली खानने आपल्या गोलंदाजीने खळबळ उडवून दिली. अलीने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ३.३ षटकात केवळ २५ धावा देत ३ विकेट घेतले. त्याच्या दमदार गोलंदाजीमुळे अमेरिकेने घरच्या मैदानावर बांगलादेशचा ६ धावांनी पराभव केला. या विजयासह यजमान संघाने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. अमेरिकेच्या विजयाचा हिरो ठरलेला अली खान आहे तरी कोण, जाणून घ्या.

अमेरिकेच्या विजयाचा हिरो अली खान कोण आहे?

अली खान हा पाकिस्तानी वंशाचा क्रिकेटपटू आहे. अली १८ वर्षांचा असताना त्याचे आई-वडील अमेरिकेत स्थायिक झाले. अली खान येथील अनेक खासगी टी-२० क्लबमध्ये खेळला. अली खानची गोलंदाजी त्याच्या वेगामुळे आणि अचूक लाईन लेंथमुळे चर्चेत येऊ लागली. कॅरेबियन प्रीमियर लीगच्या पदार्पणाच्या सामन्यात श्रीलंकेचा महान खेळाडू कुमार संगकाराला पहिल्याच चेंडूवर बाद केल्यावर अली प्रसिद्धीच्या झोतात आला.

कॅरेबियन प्रीमियर लीगनंतर अली खान जगभरातील अनेक मोठ्या क्रिकेट लीगमध्येही खेळला आहे. त्याला २०१९ मध्ये पहिल्यांदा अमेरिकेकडून खेळण्याची संधी मिळाली. अलीने पापुआ न्यू गिनीविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अली खानच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण ३३ विकेट आहेत. तेव्हापासून अली खानने अमेरिकेसाठी १५ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

हेही वाचा – VIDEO: यश दयालच्या गोलंदाजीवर भडकलेला विराट, बॉटल दिली फेकून; कोहलीचे रौद्र रूप पाहून खेळाडूही…

अली खानने वनडे व्यतिरिक्त टी-२० क्रिकेटमध्येही शानदार कामगिरी केली आहे. मात्र, या फॉरमॅटमध्ये तो अमेरिकेसाठी केवळ ८ सामने खेळू शकला आहे, ज्यामध्ये त्याने एकूण ९ विकेट्स घेतल्या आहेत. आगामी टी-२० विश्वचषक पाहता अली खानची गोलंदाजी संघासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

बांगलादेश वि अमेरिका दुसरा टी-२० सामना

बांगलादेशविरुद्ध अमेरिकेच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी गमावून १४४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ १९.३ षटकांत १३८ धावा करून सर्वबाद झाला. अमेरिकेच्या सौरव नेत्रावळकर आणि अली खान यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. सौरभने तीन षटकांत अवघ्या १५ धावा देत २ विकेट घेतले. याशिवाय अली खानच्या खात्यात तीन विकेट्स आल्या. अली खानने ३.३ षटकात २५ धावा दिल्या. सामनावीर ठरलेल्या अली खानच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अमेरिकेला हा विजय मिळवणं अधिक सोपं झालं.

हेही वाचा – RCB vs RR: पराभवानंतर अखेरचा सामना खेळलेल्या कार्तिकला विराटने दिला धीर, RCB ने खास अंदाजात दिला निरोप; VIDEO

शेडली व्हॅन शाल्कविकने दोन, जगदीप सिंग आणि कोरी अँडरसनने प्रत्येकी एक विकेट घेतली. बांगलादेशच्या डावात ७ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. बांगलादेशला सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात ६ धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात कर्णधार मोनांक पटेलने शानदार फलंदाजी केली. मोनांकने ३८ चेंडूत ४२ धावांची दमदार खेळी केली ज्यात त्याने ४ चौकार आणि १ षटकारही लगावला. याशिवाय ॲरॉन जोन्सने ३५ आणि स्टीव्ह टेलरने ३१ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. या दोघांशिवाय कोरी अँडरसननेही ११ धावांची खेळी खेळली.