Virat Kohli Viral Video: आयपीएल २०२४च्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स एकमेकांविरूद्ध भिडले होते. या सामन्यात आरसीबी संघाला पराभवाचा सामना करावा लागला तेव्हा. या विजयासह राजस्थान रॉयल्स दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचला. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानचा संध सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अंतिम फेरी गाठण्यासाठी भिडताना दिसेल. यादरम्यानचं एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये विराट कोहली आपल्या संघाचा पराभव पाहून प्रचंड भडकलेला दिसत आहे. तो रागाच्या भरात तो काहीतरी बोलतानाही दिसला आणि नंतर अर्धी भरलेली पाण्याची बाटली जमिनीवर फेकून दिली, त्याच्यासोबत उभा असलेला खेळाडूही गप्प झाला.

विराट कोहली अजूनही आयपीएल ट्रॉफी मिळवण्याच्या प्रतिक्षेत आहे. सलग सहा सामन्यांच्या विजयाच्या जोरावर आरसीबीने पुनरागमन करत आयपीएल २०२४ च्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला. शेवटच्या साखळी सामन्यात CSK विरुद्धचा त्यांचा विजयही महत्त्वाचा ठरला. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही कारण राजस्थानने एलिमिनेटर सान्यात त्यांचा चार गडी राखून पराभव केला. याच सामन्यात विराट कोहली आयपीएलमध्ये ८००० धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

सामन्यातील अखेरच्या षटकांमध्ये कोहली सीमारेषेवरून ओरडताना दिसत होता. सोशल मीडियावर असं म्हटलं जात आहे कोहली तो त्याच्याच सहकाऱ्यांवर ओरडत होता. त्या व्हिडिओच्या स्क्रीनवर यश दयाल दिसत आहे, ज्याच्या चेंडूवर हेटमायरने चौकार मारला. यासह १७व्या षटकात २१ चेंडूत २४ धावा हव्या होत्या, जे सहज गाठता येईल असे लक्ष्य होते. विराट कोहली यश दयालच्या गोलंदाजीवर वैतागलेला दिसला. विराट यशसोबत बोलण्यासाठीही पुढे गेला होता.

हेही वाचा – RCBच्या पराभवानंतर मॅक्सवेलने रागात ड्रेसिंग रूमच्या दरवाज्यावर आदळला हात, गोल्डन डक-कॅच ड्रॉपमुळे चाहत्यांनी साधला निशाणा

यश दयालचे षटक संपल्यानंतर सीमारेषेजवळ यष्टीरक्षण करणारा कोहली चांगलाच वैतागलेला दिसला. यश दयालच्या १७व्या षटकात गोलंदाजीवर लागोपाठ मोठे फटके खेळताना पाहून कोहली चांगलाच भडकला. आरसीबीला अखेरच्या षटकांमध्ये राजस्थानच्या फलंदाजांवर दबाव तयार करायचा होता, पण नेमकं त्याचवेळेस यश दयालच्या षटकात धावांची कमाई करायला मिळाली. हे पाहून कोहलीचा राग चांगलाच अनावर झाला होता. सीमारेषेजवळ संघाचा दुसरा खेळाडू त्याच्यासाठी पाणी घेऊन उभा होता. त्याच्याशी बोलत असताना विराट कोहली रागात काहीतरी बोलताना दिसत आणि मग पाणी पिऊन अर्धी बॉटल तिथेच फेकून मैदानात परत गेला.

हेही वाचा – RCB vs RR: पराभवानंतर अखेरचा सामना खेळलेल्या कार्तिकला विराटने दिला धीर, RCB ने खास अंदाजात दिला निरोप; VIDEO

पराभवानंतर आऱसीबीच्या ड्रेसिंग रूममधील व्हीडिओही व्हायरल झाला होता. या व्हीडिओमध्ये सर्वच खेळाडू निराश दिसत होते. तर मॅक्सवेल दारावर हात मारत आतमध्ये जाताना दिसला. तर विराट कोहली फाफ डू प्लेसिस, दिनेश कार्तिक यांनी संघाच्या कामगिरीबद्दल वक्तव्य केली. १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सवरही आरसीबीने दबाव आणला होता. परंतु खालच्या फळीतील फलंदाजांनी संघाला विजय मिळवून दिला. एलमिनिटेर सामन्यात आऱसीबीचा पराभव करत त्यांची विजयी मालिका संपुष्टात आणली.