PAK vs ZIM Highlight Video: टी २० विश्वचषकातील सुपर १२च्या सामन्यात गुरुवारी पाकिस्तान विरुद्ध झिम्बाम्बावे सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. झिम्बाम्बावेच्या विजयाइतकाचा गाजावाजा पाकिस्तानच्या पराभवाचा होत आहे. हा यंदाचा विश्वचषक मात्र पाकिस्तानी खेळाडूंसाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरत आहे. आधी भारताच्या विरुद्ध तर आता तुलनेने दुबळ्या मानल्या जाणाऱ्या झिम्बाम्बावेच्या समोरसुद्धा पाकिस्तान पराभूत झाला आहे. मुख्य म्हणजे हे दोन्ही पराभव अगदी हाता-तोंडाशी आलेले विजय होते पण शेवटच्या षटकात डाव पलटल्याने पाकिस्तानी टीमला पराभव सहन करावा लागला. झिम्बाम्बावे विरुद्ध सामन्याच्यानंतर पाकिस्तानचा गोलंदाज शादाब खान याचा तोल ढळला. आता त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मोहम्मद वसीम ज्युनियर आणि शादाब खान यांनी झिम्बाब्वेला २० षटकात ८ बाद १३० धावांवर रोखले, दोघांनी या सामन्यात सात विकेट घेतल्या होत्या. १३१ हे पाकिस्तानसाठी कठीण लक्ष्य नव्हते, पण आव्हानाचा पाठलाग करताना दोन्ही सलामीवीर बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांना स्वस्तात तंबूत परतावे लागले. विश्वशतः शादाब खानने फलंदाजीतही पाकिस्तानी संघाची बाजू सावरून धरली होती. शान मसूदसह भागिदारी करून शादाबने ५२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती. या भागीदारीने पाकिस्तानला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. पण शेवटच्या षटकांमध्ये काही सलग विकेट्समुळे झिम्बाब्वेने खेळ पालटून टाकला.
पाकिस्तान विरुद्ध झिम्बाम्बावे सामन्यातील पराभव शादाब खानच्या खूपच जिव्हारी लागल्याचं एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममधील शादाबचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात शादाब जमिनीवर गुडघे टेकून अक्षरशः रडताना दिसत आहे.
अन शादाब खान रडू लागला
“जेव्हा शादाब आणि शान भागीदारी करत होते, तेव्हा शादाब आधी बाद झाला आणि तिथूनच पाठोपाठ पाकिस्तान एक एक गडी गमावत गेला. हा पराभव पाकिस्तानच्या खेडूळाडूंसाठी मोठा धक्का होता, सामन्यांनंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने प्रतिक्रिया देताना सांगितले की, पहिली ६ षटके, नवीन चेंडूचा चांगला वापर केला नाही पण आम्ही चेंडूचा चांगला सामना केला. बाहेर बसू, आमच्या चुकांवर चर्चा करू आणि प्रशिक्षण घेऊन आमच्या पुढच्या सामन्यात जोरदार पुनरागमन करू, ”. पाकिस्तान सध्या टी २० विश्वचषकाच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.