scorecardresearch

Premium

विराटचे सलग दुसरे द्विशतक, सचिनच्या विक्रमाशी बरोबरी

सहावे द्विशतक झळकवणारा तिसरा भारतीय फलंदाज

virat kohli, equalled, sachin tendulkar, virat kohali, sixth double century, second day of the third Test, Sri Lanka
विराट कोहली ( छाया सौजन्य बीसीसीआय)

भारताचा कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत सलग दुसरे द्विशतक झळकावले. नागपूरच्या मैदानातील फॉर्म कायम राखत दिल्लीच्या फिरजशहा कोटला मैदानात त्याने कारकिर्दीतील सहाव्या द्विशतकाला गवसणी घातली. दुसऱ्या दिवशी रोहितच्या साथीनं कोहलीने वैयक्तिक १५६ धावावरुन खेळाला सुरुवात केली. सावध सुरुवात केल्यानंतर नेहमीप्रमाणे तो लयीत आला. खराब चेंडूवर प्रहार आणि चांगल्या चेंडूला आदर करत त्याने आपली खेळी पुढे सरकवली. विराट कोहलीच्या या द्विशतकी खेळीनंतर तो शतकांचा भुकेला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कसोटी सामन्यात सहावे द्विशतक झळकवणारा विराट तिसरा भारतीय फलंदाज ठरला.

या द्विशतकासह विराट सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि मास्टर ब्लास्टर सचिनच्या ६ द्विशतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. यापूर्वी वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी कसोटी सामन्यात ६ द्विशतके झळकावली होती. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके करण्याचा विक्रम ब्रॅडमन यांच्या नावे आहे. त्यांनी ५२ सामन्यात सर्वाधिक १२ द्विशतके ठोकण्याचा पराक्रम केला. त्यानंतर अकरा द्विशतकांसह संगकारा दुसऱ्या स्थानावर आहे. तर वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारानं १३१ सामन्यात ९ द्विशतके झळकावली आहेत. इंग्लंडचे दिग्गज हॅमॉन्ड आणि श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धने हे प्रत्येकी ७ द्विशतकासह या यादीत चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Virat kohli equalled sachin tendulkar record he smash sixth double century in second day of the third test against sri lanka

First published on: 03-12-2017 at 10:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×