Virat Kohli Net Worth And Record: क्रिकेट जगतात किंग कोहली म्हणून ओळख निर्माण केलेला भारताचा सर्वोत्तम फलंदाज विराट कोहलीने आज वयाच्या ३६ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. २० जून २०२५ रोजी इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या भारताच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या काही दिवस आधी त्याने हा निर्णय घेतला.

कोहलीने इंस्टाग्रामवर एका पोस्टच्या माध्यमातून त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. या पोस्टमध्ये त्याने कसोटी क्रिकेटशी असलेले त्याचे भावनिक नाते आणि त्याच्या कारकिर्दीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

दरम्यान भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा यानेही काही दिवसांपूर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती. या दोन दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर भारताच्या कसोटी संघात मोठी पोकळी निर्माण होणार हे निश्चित आहे.

१२५० कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती

२००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा विराट कोहली सध्या १,०५० कोटी रुपयांच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत क्रीडापटूंपैकी एक आहे, तर त्याची पत्नी, बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माकडे अतिरिक्त २५५ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. याचबरोबर त्यांची दिल्ली, मुंबई आणि गुडगाव येथेही मालमत्ता आहे. कोहली क्रिकेट कमाईव्यतिरिक्त गुंतवणूक, ब्रँड एंडोर्समेंट आणि व्यवसाय उपक्रमांतूनही कमाई करतो. स्टॉकग्रोच्या मते, विराट आणि अनुष्काची एकत्रित संपत्ती तब्बल १,२५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

बीसीसीआयकडून वर्षाला ७ कोटींचे मानधन

कोहलीची प्राथमिक कमाई त्याच्या बीसीसीआय ए+ दर्जाच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टपासून सुरू झाली. त्याला मॅच फी व्यतिरिक्त बीसीसीआयकडून वार्षिक ७ कोटी रुपये मिळतात.

आयपीएलमधून आतापर्यंत २१२.४४ कोटी रुपये उत्पन्न

विराट आयपीएलमध्ये २००८ पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करत आहे. गेल्या काही वर्षांत, त्याच्या आयपीएल पगारात प्रचंड वाढ झाली आहे. २००८ मध्ये १२ लाख रुपयांवरून २०१८ ते २०२१ पर्यंत तो वार्षिक १७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. २०२५ मध्ये, विराटला आयपीएलमधून २१ कोटी रुपये मिळणार आहे. यानंतर त्याचे आयपीएलचे एकूण उत्पन्न २१२.४४ कोटी रुपये होईल, असे वनक्रिकेटने वृत्त दिले आहे. २०२१ मध्ये आरसीबीचे कर्णधारपद सोडले असले तरी, तो आरसीबीचा पहिल्या पसंतीचा खेळाडू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट कोहली फाऊंडेशन

दरम्यान, विराट कोहली जरी हजारो कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक असला तरी, त्याने सामाजिक भान मात्र जपले आहे. तो विराट कोहली फाऊंडेशनच्या माध्यमातून तळागाळातील मुलांच्या क्रीडा, आरोग्य आणि शिक्षणासाठीही मदत करतो.