Virat Kohli shared pictures and videos from the gym ahead of the first Test: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्याची सुरुवात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना १२ जुलैपासून सुरु होणार आहे. तत्पुर्वी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा जिममधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. विराट कोहली नेहमीच फिटनेस आणि व्यायामाला प्रोत्साहन देण्यासाठी ओळखला जातो. कोहलीची नुकतीच सोशल मीडियावरील पोस्ट हे त्याचेच उदाहरण आहे. रविवारी विराटने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जिममध्ये व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केला.

व्यायामाच्या महत्त्वावर भर देताना, भारतीय क्रिकेटपटूने सांगितले की तो आठ वर्षांपासून त्याच्या व्यायामशाळेच्या वेळापत्रकासाठी वचनबद्ध आहे, जे त्याचे संपूर्ण आरोग्य आणि फिटनेस राखण्यासाठी उपयुक्त ठरले आहे. पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये कोहली त्याच्या हॅमस्ट्रिंग स्नायूंना बळकट करण्यासाठी फिटनेस प्रशिक्षकाची मदत घेताना दिसत आहे. लेग वर्कआउटला प्राधान्य देत कोहलीने लिहिले, “प्रत्येक दिवस लेग डे असायला हवा. ८ वर्षे आणि पुढे.”

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक मानला जातो. तो त्याच्या अपवादात्मक फिटनेससाठी ओळखला जातो. फिटनेसच्या समस्येमुळे कोहली क्वचितच टीम इंडियातून बाहेर पडला आहे.


व्यायामशाळेच्या कठोर वेळापत्रकाचे पालन करून कोहली उर्वरित खेळाडूंसाठी एक उदाहरण बनला आहे. या वचनबद्धतेमुळे तो विकेट्सच्या दरम्यान वेगाने धावू शकतो, अनपेक्षित धावा काढू शकतो आणि असाधारण झेल घेऊ शकतो. कोहली सध्या टीम इंडियासोबत १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याची तयारी करत आहे. कॅरेबियन दौऱ्यात कोहलीची कसोटी कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. कोहलीने वेस्ट इंडिज दौऱ्यावर नऊ सामन्यांमध्ये केवळ ३५.६२ च्या सरासरीने ४६३ धावा केल्या आहेत.

हेही वाचा –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भारत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.