India vs West Indies 2nd test Day 3 : विंडीजविरुद्धची दुसरी कसोटी भारताने १० गडी राखून जिंकली. उमेश यादवचा भेदक मारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे – ऋषभ पंत जोडीची भागीदारी याच्या बळावर भारताने सामना जिंकला आणि मालिका २-० अशी जिंकली. विंडीजचा दुसरा डाव १२७ धावांत आटोपल्यानंतर भारताने ७२ धावांचे अंतिम लक्ष्य एकही बळी न गमावता पूर्ण केले. दुसऱ्या डावात पृथ्वी शॉने आणि लोकेश राहुल धावा केल्या.

त्याआधी विंडीजचा दुसरा डाव १२७ धावांत आटोपला. विंडीजच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. ६ धावांवर असताना विंडीजने २ गडी गमावले. क्रेग ब्रेथवेट शून्यावर बाद झाला. त्यानंतर संघाची धावसंख्या ६ असताना भारताने विंडीजला दुसरा धक्का देत कायरन पॉवेलला तंबूत धाडले. त्यानंतर हेटमायर १७ धावांवर तर होप २८ धावांवर बाद झाला. या दोघांमध्ये ३९ धावांची भागीदारी झाली. हेटमायरला कुलदीप यादवने तर होपला जाडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. चहापानाच्या विश्रांतीच्या काही काळ आधी पुन्हा विंडीजला एकापाठोपाठ दोन धक्के बसले. गेल्या डावातील शतकवीर रोस्टन चेस आणि शेन डावरीच हे दोघे झटपट बाद झाले. त्यामुळे चहापानापर्यंत विंडीजची अवस्था ६ बाद ७६ अशी झाली होती. त्यानंतर तिसऱ्या सत्रातदेखील विंडीजच्या फलंदाजांना फारशी छाप पाडता आली नाही. होल्डर(१९), अॅम्ब्रीस (३८), वॅरीकन (७) आणि गॅब्रियल (१) हे झटपट बाद झाले. त्यामुळे त्यांचा डाव अवघ्या १२७ धावांत आटोपला.

भारताचा पहिला डाव ३६७ धावांत संपुष्टात आला आणि उपहाराची विश्रांती घेण्यात आली. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने पाच बळी घेत भारताचा डाव लवकर संपवला. काल दुसऱ्या दिवसअखेर भारताने ४ बाद ३०८ धावांपर्यंत मजल मारली होती. त्या धावसंख्येवरून आज खेळाला सुरूवात झाली. दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारताने वर्चस्व राखले होते. पण आज तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतासाठी अतिशय खराब झाली. दिवसाच्या सुरुवातीच्या खेळात कर्णधार जेसन होल्डर याने एकाच षटकात खेळपट्टीवर स्थिरावलेला अजिंक्य रहाणे (८०) आणि रवींद्र जाडेजा (०) याला बाद केले. विशेष म्हणजे हे षटक निर्धाव टाकण्यात त्याला यश आले. त्यानंतर ऋषभ पंत ९२ धावांवर बाद झाला. पाठोपाठ कुलदीप यादव (६) आणि उमेश यादव (२) धावांवर बाद झाला. पण अश्विनने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत भारताला साडेतीनशे पार मजल मारून दिली. अखेर गब्रीएलने अश्विनचा ३५ धावांवर त्रिफळा उडवला. भारताकडून पृथ्वी शॉ, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांनी चांगली कामगिरी केली. कोहली वगळता तीनही खेळाडूंनी अर्धशतक ठोकले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Live Blog

16:03 (IST)14 Oct 2018
भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा; विंडीजचा दुसरा डाव सर्वबाद १२७

विंडीजचा दुसरा डाव १२७ धावांत आटोपला. या डावात उमेशने ४ तर जाडेजाने ३ बळी टिपले. 

16:00 (IST)14 Oct 2018
अॅम्ब्रीस पाठोपाठ वॅरीकन बाद, विंडीजने ९ गडी तंबूत

पुन्हा एकदा विंडिजने पाठोपाठ दोन गडी गमावले. अॅम्ब्रीसला जाडेजाने ३८ धावांवर बाद केला.  पाठोपाठ वॅरीकनला अश्विनने बाद केले.

15:28 (IST)14 Oct 2018
कर्णधार जेसन होल्डर बाद; विंडीजचा सातवा गडी बाद

कर्णधार जेसन होल्डर बाद झाला आणि विंडीजने सातवा गडी गमावला. जाडेजाने त्याला १९ धावांवर माघारी धाडले.

14:16 (IST)14 Oct 2018
चेस पाठोपाठ डावरीच बाद, चहापानापर्यंत विंडीजची अवस्था ६ बाद ७६

चहापानाच्या विश्रांतीच्या काही काळ आधी विंडीजला एकापाठोपाठ दोन धक्के बसले. गेल्या डावातील शतकवीर रोस्टन चेस आणि शेन डावरीच हे दोघे झटपट बाद झाले. त्यामुळे चहापानापर्यंत विंडीजची अवस्था ६ बाद ७६ अशी झाली.

13:25 (IST)14 Oct 2018
विंडीजचे चार गडी तंबूत; हेटमायर पाठोपाठ होप माघारी

विंडीजने पहिले दोन गडी ६ धावांमध्ये गमावले होते. त्यानंतर हेटमायर १७ धावांवर तर होप २८ धावांवर बाद झाला. या दोघांमध्ये ३९ धावांची भागीदारी झाली. हेटमायरला कुलदीप यादवने तर होपला जाडेजाने तंबूचा रस्ता दाखवला.

12:30 (IST)14 Oct 2018
विंडीजची खराब सुरुवात; ६ धावांत २ गडी माघारी

विंडीजच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. शून्यावर विंडीजने पहिला गडी गमावला. क्रेग ब्रेथवेट शून्यावर बाद झाला. त्यानंतर संघाची धावसंख्या ६ असताना भारताने विंडीजला दुसरा धक्का देत कायरन पॉवेलला तंबूत धाडले.

11:47 (IST)14 Oct 2018
पहिल्या डावात भारताच्या ३६७ धावा; कर्णधार होल्डरने टिपले ५ बळी

भारताचा पहिला डाव ३६७ धावांत संपुष्टात आला आणि उपहाराची विश्रांती घेण्यात आली. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने पाच बळी घेत भारताचा डाव लवकर संपवला.

11:36 (IST)14 Oct 2018
तळाच्या फळीत अश्विनची झुंज; भारत ३५० पार

ऋषभ पंत ९२ धावांवर बाद झाला. पाठोपाठ कुलदीप यादव (६) आणि उमेश यादव (२) धावांवर बाद झाला. पण अश्विनने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत भारताला साडेतीनशे पार मजल मारून दिली.

11:10 (IST)14 Oct 2018
भारताला नववा धक्का; उमेश यादव माघारी

भारताला नववा धक्का; उमेश यादव माघारी

10:50 (IST)14 Oct 2018
कुलदीप यादव त्रिफळाचित; भारताचा आठवा गडी बाद

भारताच्या कुलदीप यादवला कर्णधार जेसन होल्डरने त्रिफळाचित केले. त्याने २१ चेंडूत ६ धावा केल्या. जेसन होल्डरने डावातील पाचवा बळी टिपला.

10:08 (IST)14 Oct 2018
ऋषभ पंत पुन्हा ९२ धावांवर बाद; भारताचा सातवा गडी तंबूत

भारताचा यष्टिरक्षक ऋषभ पंत हा पुन्हा एकदा शतकाला मुकला. पहिल्या सामन्यातील डावाप्रमाणेच या सामन्यातही तो ९२ धावांवर बाद झाला. त्याला गब्रीएल च्या गोलंदाजीवर झेलबाद केले.

09:47 (IST)14 Oct 2018
भारतासाठी दिवसाची खराब सुरुवात; रहाणे, जाडेजा एकाच षटकात तंबूत

तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतासाठी अतिशय खराब झाली. दिवसाच्या सुरुवातीच्या खेळात कर्णधार जेसन होल्डर याने एकाच षटकात खेळपट्टीवर स्थिरावलेला अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जाडेजा याला बाद केले. विशेष म्हणजे हे षटक निर्धाव टाकण्यात त्याला यश आले.