india vs Australia 2nd ODI Live Streaming Details: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. भारतीय फलंदाजांच्या फ्लॉप शो मुळे आणि पावसामुळे सामन्याचा निकाल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १३१ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज पूर्ण करत सामना खिशात घातला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान दुसरा सामना केव्हा, कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना केव्हा होणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना गुरुवारी २३ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना कुठे होणार आहे?
हा सामना ॲडीलेडच्या ॲडीलेड ओव्हलच्या मैदानावर होणार आहे.
भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक सकाळी ८:३० वाजता होईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता. तर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही जियो हॉट स्टारवर पाहू शकता.
या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल
दुसऱ्या वनडे सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:
रोहित शर्मा, शुबमन गिल ( कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.