World Cup 2023 opening ceremony: यंदाच्या वर्ल्डकप २०२३चे यजमानपद भारताला मिळाले असून त्याची सुरुवात ५ ऑक्टोबरपासून होणार आहे. त्याआधी ४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्घाटन सोहळा आयोजित केला जाऊ शकतो. या रंगतदार कार्यक्रमात बॉलिवूड स्टार्स भाग घेऊ शकतात. त्या दिवशी सर्व १० संघांचे कर्णधारही तेथे उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी, स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि गेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभूत झालेला संघ न्यूझीलंड यांच्यात होईल.

विश्वचषक स्पर्धेतील सराव सामने ३ ऑक्टोबरला संपणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सराव सामना संपल्यानंतर सर्व कर्णधार अहमदाबादमध्ये जमतील. सर्व प्रसारमाध्यमांशी संवाद साधून फोटो काढणार आहेत. हा दिवस ‘कॅप्टन डे’ म्हणून ओळखला जातो. यानंतर सायंकाळी सर्व कर्णधार उद्घाटन समारंभात सहभागी होतील. अहमदाबादमध्ये वर्ल्डकपचा ​​अंतिम सामनाही १९ नोव्हेंबरला होणार आहे.

Indian men women team entered archery world cup 2024 finals
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक 
Stuart Broad Believes Rishabh Pant Should be Indias wicketkeeper batsman in world cup squad
IPL 2024: “त्याचा शॉट पाहून मला वाटलं तो T20 WC संघात असेल”, स्टुअर्ट ब्रॉड ‘या’ भारतीय खेळाडूमुळे झाला प्रभावित!
Top 5 Oldest Player To Score A Century In IPL
IPL 2024 : रोहित शर्मासह ‘या’ पाच सर्वात वयस्कर खेळाडूंनी आयपीएलमध्ये झळकावलयं शतक, जाणून घ्या कोण आहेत?
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने

उद्घाटन समारंभाच्या एक दिवस आधी सहा कर्णधार सामने खेळण्यात व्यस्त असतील

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) सदस्य, जागतिक क्रिकेट प्रशासकीय मंडळाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन समारंभाच्या एक दिवस आधी, १० पैकी ६ कर्णधार खूप व्यस्त असतील. भारताची स्पर्धा नेदरलँडशी होणार आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार असून श्रीलंकेचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. अशा परिस्थितीत या सहा संघांच्या कर्णधारांना सामना संपल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी पहाटे अहमदाबादला जावे लागेल.

हेही वाचा: Matthew Hayden: ना कुलदीप, ना चहल, मॅथ्यू हेडनने निवडला वर्ल्डकपसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ; जाणून घ्या कोणाला मिळाले स्थान?

भारतातील १० शहरांमध्ये सामने होणार आहेत

विश्वचषकात एकूण ५८ सामने खेळले जाणार आहेत. यामध्ये १० सराव सामन्यांचा समावेश आहे. विश्वचषकाचे सामने भारतातील १० शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे सामने होणार आहेत. गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम व्यतिरिक्त हैदराबाद येथे सराव सामने होणार आहेत.

श्रीलंका आणि नेदरलँडला क्वालिफायरमधून प्रवेश मिळाला

या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. श्रीलंका आणि नेदरलँडचे संघ पात्रता म्हणून या स्पर्धेत पोहोचले आहेत. या दोघांशिवाय यजमान भारत, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ विश्वचषकात दिसणार आहेत.

हेही वाचा: World Cup 2023: माजी निवड समिती अध्यक्षांनी निवडली वर्ल्डकपसाठी ड्रीम टीम, 3Dम्हणत सोशल मीडियावर चाहत्यांनी उडवली खिल्ली

सर्व विश्वचषक २०२३ संघांचे कर्णधार

भारत: रोहित शर्मा

पाकिस्तान : बाबर आझम

इंग्लंड: जोस बटलर

ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स

न्यूझीलंड: टॉम लॅथम (केन विल्यमसन खेळत नाही)

श्रीलंका: दासुन शनाका

बांगलादेश: शकिब अल हसन

नेदरलँड: स्कॉट एडवर्ड्स

दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा

अफगाणिस्तान: हशमतुल्ला शाहिदी