IND vs AFG, World Cup: बुधवारी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात विश्वचषकातील नववा सामना खेळला जाणार आहे, परंतु त्याआधी भारताच्या विश्वचषक सामन्यांमध्ये शुबमन गिलच्या सहभागावर निर्णय घेण्यासाठी भारतीय निवड समितीची बैठक होणार आहे. वास्तविक, शुबमन गिल चेन्नईत पोहचल्यानंतर डेंग्यूचा बळी ठरला, त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना खेळू शकला नाही.

शुबमन गिलचे प्लेटलेट काउंट ७०००० पर्यंत घसरले होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, तेथे त्यांना ड्रिप देखील द्यावी लागली. अशा परिस्थितीत त्याला बरे होण्यासाठी आठवडाभराहून अधिक कालावधी लागू शकतो, असे दिसते. अशा परिस्थितीत त्याच्या बदलीची तयारी ठेवायची असेल, तर निवड समितीला संघ व्यवस्थापनाशी चर्चा करावी लागेल, त्यासाठी ती तयार आहे. संघाने विनंती केल्यास यशस्वी जैस्वाल किंवा ऋतुराज गायकवाड यांचा बॅकअप सलामीवीर म्हणून संघात समावेश केला जाऊ शकतो.

not to share any photo or video of the stadium on their accounts on the day of the match.
IPL 2024 : मीडिया हक्कांबाबत बीसीसीआयची कठोर भूमिका, संघ-खेळाडू आणि समालोचकांना दिल्या ‘या’ विशेष सूचना
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्याच्या काही दिवस आधी, शुबमन गिल डेंग्यूचा बळी असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येऊ लागल्या. सोमवारी भारतीय संघ अफगाणिस्तानचा सामना करण्यासाठी दिल्लीला जात असताना गिल चेन्नईतच थांबला होता. त्यानंतर, इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, तीव्र थकवा जाणवत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आल्याचे समोर आले.

हेही वाचा: IND vs AFG: शुबमन गिल पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याला मुकण्याची शक्यता! भारतीय संघात ‘या’ धडाकेबाज खेळाडूची होऊ शकते सरप्राईज एन्ट्री

रात्रभर रुग्णालयात मुक्काम करून पुढील तपासानंतर सकाळी गिल हॉटेलमध्ये गेला. डॉक्टरांनी त्यांना ४८ तास विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून गुरुवारी त्यांच्या प्रकृतीचे पुन्हा मूल्यांकन केले जाईल, असे विश्वसनीयरित्या कळते. सामान्य परिस्थितीत, कोणत्याही रुग्णाला डेंग्यू आणि थकवा यातून बरे होण्यासाठी किमान तीन आठवडे लागतात.

बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “गिल ९ तारखेला संघासोबत दिल्लीला जाणार नाही. आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नई येथे संघाचा पहिला सामना खेळू न शकलेला सलामीवीर फलंदाज शुबमन गिल, ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार्‍या अफगाणिस्तान विरुद्ध संघाचा पुढील सामनाही खेळू शकणार नाही,” असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तो चेन्नईत राहणार आहे आणि वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असेल.

हेही वाचा: PAK vs SL, World Cup: आशिया चषकातील बदला घेणार का पाकिस्तान? श्रीलंकेने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

भारताचा २०२३ विश्वचषक संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (विकेटकीपर), विराट कोहली, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, शार्दुल यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.