कुस्तीपटूंच्या आरोपानंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग हे २२ जानेवारीला आपल्या पदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे. १८ जानेवारी रोजी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि अनेक कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि कुस्ती मंडळाचा निषेध केला. विनेश फोगटने भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे.

आता, अहवालात असे म्हटले आहे की WFI अध्यक्ष २२ जानेवारी रोजी होणाऱ्या आपत्कालीन जनरल कौन्सिलच्या बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात. भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सर्व आरोपांना उत्तरे दिली आणि त्यानंतर ते दुपारी १२ वाजता दिल्लीहून गोंडासाठी रवाना झाले. WFI अध्यक्षांनी कुस्तीपटूंना फटकारले होते की ते राष्ट्रीय स्तरावर चाचण्या देण्यास किंवा लढण्यास तयार नाहीत. आपल्याविरुद्ध हे सुनियोजित कट असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहंनी बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करावी’; पुण्यातील कुस्तीगीराची मागणी

लैंगिक छळावर ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले, “मला जेव्हा कळले की कुस्तीपटू आंदोलनासाठी बसले आहेत, तेव्हा मी विमानाचे तिकीट घेऊन लगेच दिल्लीला पोहोचलो. संघाने कधी कोणत्या खेळाडूचे शोषण केले आहे, हे सांगायला कोणी समोर आहे का? माझे शोषण झाले असे माझ्यासमोर कोणी म्हणेल का? हे चुकीचे आहे. यामध्ये मुख्य प्रशिक्षकाचे नावही घेण्यात आले आहे. ते म्हणाले, “मला विचारायचे आहे की नॅशनलमध्ये खेळणार नाहीस आणि ओपन-नॅशनलमध्ये खेळणार नाहीस. त्यानंतर तुम्ही म्हणाल की एकच चाचणी असावी. देशातील इतर खेळाडूंनाही आशियाई किंवा ऑलिम्पिक स्तरावर खेळायचे आहे. तुमची हीच अडचण फेडरेशनची असताना १० वर्षात का नाही सांगितली?

हेही वाचा: Usain Bolt: आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके विजेता काही क्षणात कंगाल; वायुवेगाने धावणाऱ्या उसेन बोल्टला तब्बल ९८ कोटींचा चुना!

WFI अध्यक्ष पुढे म्हणतात, “हे माझ्याविरुद्धचे षडयंत्र आहे. त्यामध्ये एका मोठ्या उद्योगपतीचा हात आहे. जेव्हा विनेश फोगट हरली तेव्हा मीच तिला प्रोत्साहन दिले होते. जेव्हा दीपक पुनिया टोकियो ऑलिम्पिकमध्ये पराभूत झाला तेव्हा त्याने रशियन प्रशिक्षकाने रेफ्रीला मारहाण केली. विनेश फोगटने ऑलिम्पिक ड्रेस परिधान केला नव्हता. मी खेळाडूंशी बोलणार आहे. मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहे.”

हेही वाचा: शुबमनच्या शानदार द्विशतकानंतर चाहत्यांनी केली साराच्या engagementची घोषणा! सोशल मीडियावरील व्हायरलमागे हे आहे तथ्य…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजीनामा न देण्याच्या भूमिकेवर स्पष्ट असणाऱ्या अध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणतात “लैंगिक छळ कधीच झाला नाही. जर एखाद्या खेळाडूनेही पुढे येऊन हे सिद्ध केले तर मी स्वत:ला फाशी देईन. हे सर्व आरोप खोटे आहे. मला आशा आहे की तिने (विनेश) ते लिहून माझ्याकडे पाठवले असतील तर मला जे शक्य आहे ते मी उत्तर देईन आणि बाकीची सीबीआय किंवा पोलिस चौकशी करू शकतात. हा खूप मोठा आरोप आहे.” मात्र अवघ्या २४ तास आधी त्यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे.